Hair Care Tips : प्रदूषणामुळे केस डॅमेज झाले आहेत? याप्रकारे नैसर्गिक पद्धतीने करा पुन्हा नव्यासारखे

सुंदर केस प्रतेक स्त्रीला हवेहवेसे वाटतात. लांब , काळे , घनदाट आणि मजबूत केस आपली सुद्धा असावी असं प्रत्येकाला वाटत.
Hair Care Tips
Hair Care Tips Saam Tv
Published On

Hair Care Tips : सुंदर केस प्रतेक स्त्रीला हवेहवेसे वाटतात. लांब , काळे , घनदाट आणि मजबूत केस आपली सुद्धा असावी असं प्रत्येकाला वाटत. परंतु आजच्या या काळात अनेक स्त्रियांची भरपुर प्रमाणत केस गळतात.

आज आम्ही तुम्हाला गळणारे केस (Hair) थांबण्यासाठी काही खास घरगुति टीप्स सांगणारं आहोत. जेणेकरून तुमचे केस मुलायम आणि चमकदार बनतील. त्याचबरोबर तुमचे केस गळण्यापसून थांबतील.

सुंदर केसांची आवड मला नाही असं कधी होणारच नाही. केस सुंदर असल्यावर व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये चार चांद लागून जातात. कोणत्याही लुकला सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी हेअरस्टाईल अत्यंत गरजेची असते.

परंतु बऱ्याच कारणांमुळे आपले केस पूर्णपणे खराब होतात आणि केसांमधील नैसर्गिक (Natural) चमक निघून जाते. अनेकांचे केस खूपच ड्राय पडलेले असतात. अशा प्रकारच्या केसांच्या लोकांनी हेड मसाज सारख्या ट्रीटमेंट घेतल्या पाहिजे.

जेणेकरून त्यांचे केस मुलायम आणि चांगले राहतील. त्याचबरोबर तुम्ही नॅचरल पद्धतीने देखील तुमच्या केसांना स्मूद असेल सिल्की बनवू शकता. सिल्की आणि शायनी केसांसाठी जबरदस्त घरगुती टिप्स.

Hair Care Tips
Hair Care Tips : चुकीच्या पद्धतीने केस धुणे पडू शकते महागात, याप्रकारे रोखा केसगळतीची समस्या !

1. केसांच्या वाढीसाठी आणि केसांना चमक येण्यासाठी नारळाचे दूध अत्यंत फायदेशीर असते. त्याचबरोबर तुम्ही नारळाच्या दुधामध्ये कॅस्टर ओईल मिक्स करून एक चांगला हेअरमास्क बनवा. त्यानंतर ओल्या केसांमध्ये हा पॅक काही वेळासाठी लावून ठेवा.

त्यानंतर एक टॉप बेल गरम पाण्यामध्ये भिजवून केसांवरती ठेवून द्या. हॉटेल तुम्हाला 20 मिनिटे केसांवरती तसाच ठेवायचा आहे. वीस मिनिटे झाल्यावरती केस व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

ही पद्धत वापरल्याने तुमचे केस अतिशय स्मूथ आणि सिल्की होतील. त्याचबरोबर तुमच्या केसांना प्राकृतिक चमक देखिल येईल.

Hair Care Tips
Hair Care Tips : केस विंचरतानाही गळतायत? तर स्वयंपाकघरातील 'या' सुपरफुड्सचे सेवन आजच सुरू करा

2. केसांना घनदाट स्मुद आणि सिल्की बनवण्यासाठी कोरफड ही अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि अर्धा कप ऑलिव्ह ऑइल घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करायच आहे.

आता हे मिश्रण ओल्या केसांमध्ये तीस मिनिटं लावून ठेवायचे आहे. त्यानंतर एक टॉवेल गरम पाण्यामध्ये बुडवून आणि पिळून दहा मिनिटे केसांवरती गुंडाळून ठेवायचा आहे.

वेळ झाल्यानंतर केस धुवून टाकायची आहेत. आठवड्यातून एकदा तुम्हाला ह्या घरगुती ट्रिक्स वापरायचे आहेत. सतत वापरामुळे तुमचे केस सुंदर आणि चमकदार बनतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com