Hair Care Tips : केस विंचरतानाही गळतायत? तर स्वयंपाकघरातील 'या' सुपरफुड्सचे सेवन आजच सुरू करा

केस गळण्याच्या समस्या आजकाल खूप जास्ती प्रमाणात वाढलेल्या आहेत.
Hair Care Tips
Hair Care Tips Saam Tv

Hair Care Tips : केस गळण्याच्या समस्या आजकाल खूप जास्ती प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यासाठी आपण केसांवर वेगवेगळे प्रयोग करून केस मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो परंतू तुम्ही योग्य आहार घेतला नाही.

तर तुमच्या केस (Hair) गळनाच्या समस्या जास्ती वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या आहारात या काही सूपरफुड (Superfood) चा समावेश करून तुम्ही या केस गळण्याच्या समस्या दूर करू शकता चला तर या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Hair Care Tips
Hair Care Tips : चुकीच्या पद्धतीने केस धुणे पडू शकते महागात, याप्रकारे रोखा केसगळतीची समस्या !

पालकचे सेवन करा -

तुम्हाला जर केस गळण्याच्या समस्या दूर करायचा असतील तर तुमच्या आहारात पालक चा समावेश करा. केसांच्या वाढीसाठी आयरन ची गरज असते ते आयरन पालक मधून जास्त प्रमाणात मिळते त्यामुळे तुमच्या आहारात पालकाचा समावेश करावा. हिवाळ्यात पालक सहज उपलब्ध होते.

गाजर रस -

गाजर मध्ये व्हिटॅमिन बी, सी, डी आणि इ असते त्यामुळे केसांना आवश्यक ते पोषक तत्व मिळण्यास मदत होते आणि त्याने केस गळ्याच्या समस्या हळूहळू कमी होते.गाजर चे सेवन केल्यामुळे तुम्हाला जर इतर कोणत्या ही आरोग्य समस्या असतील तर त्यापनण हळुहळू कमी होतील.

Hair Care Tips
Hair Care Tips : केस विंचरताना 'या' 4 चुका करू नका; वाढू शकते टक्कल पडण्याची समस्या

रताळ्याचे सेवन करा -

रताळे खाणे केसांसाठी खूप फायेशीर असते. केस वाढण्यासाठी रताळे खूप मदत करते.रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन चे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे केस वाढण्यासाठी मदत होते म्हणून तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश केला पाहिजे.

लिंबूवर्गीय फळ -

कमजोर रोग प्रतिकारशक्तीमुळे केस गळतीच्या समस्या येऊ शकतात त्यामुळे तुमच्या आहारात लिंबूवर्ग फळांचा समावेश केला पाहिजे त्यामध्ये संत्री,किवी लिंबू ही फळे खाल्ली पाहिजे.

अंबाडीच्या बिया -

या बियांमध्ये पोषक तत्व खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे केसांना आवश्यक असलेल्या पोषक तत्वे म्हणून केस गळण्याच्या समस्या टाळू शकतो. यामध्ये विटामिन ई,ओमेगा ३ फॅटी ऍसिड ही पोषकतत्वे केसांसाठी आवश्यक असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com