ये हालो... गुजरातच्या गरब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा; UNESCO च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश

UNESCO Intangible Cultural Heritage List : भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या सांस्कृतिक वारसा देशाला लाभला आहे.UNESCO ने अमृर्त सांस्कृतिक वारसा यादीत गरब्याचा समावेश केला आहे.
Garba In Unesco List
Garba In Unesco ListSaam Tv
Published On

Gujarat Garba In UNESCO Intangible Cultural Heritage List:

भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या सांस्कृतिक वारसा देशाला लाभला आहे. भारतात सर्वजण एकत्र सण-उत्सव साजरा करतात. गुजरातमधील गरबा, महाराष्ट्रातील लावणी, पंजाबमधील भांगडा हे सर्व जगभरात खेळले जातात. यातील गरब्याला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे.

UNESCO ने अमृर्त सांस्कृतिक वारसा यादीत गरबाचा समावेश केला आहे. युनेस्कोने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. गरबा या खेळाला आता आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे.

गरब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर केंद्रिय मंत्री जी किशन रेड्डी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. 'गुजरातचा गरबा युनेस्कोच्या अमृर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा देशाचा वारसा आहे. गरबा हे उत्सव, भक्ती, सामाजिक समता आणि परंपरेचे प्रतिक आहे.

या यादीतील समावेश (ICH) हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे शक्य झाले आहे'. अशी पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.

युनेस्कोचा हा निर्णय भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून आनंद व्यक्त केला जात आहे. युनेस्कोच्या या निर्णयावर गरबा आयोजकांनी आनंद व्यक्त केला आहे.

गरबा

नवरात्रीत संपूर्ण देशभर गरबा खेळला जातो. प्रामुख्याने गुजरातमध्ये गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. गुजरातमध्ये नवरात्रोत्सवच्या काळात लाखो लोक गरबा नृत्यावर नाचतात. या काळात अनेक ठिकाणी गरब्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते.

Garba In Unesco List
QR Code आणि UPI च्या स्कॅमिंगला तुम्हीही बळी पडलात? Cyber Fraud ला सरकार कसा बसवणार आळा, वाचा एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com