संधीवाताचा वाढता आजार आणि हेमेटोलॉजिस्टची कमतरता!

सध्याच्या काळात सांधेदुखी हा आजार वाढताना दिसत आहे.
spondylosis, Cervical Pain, Health tips, rheumatoid arthritis, Hematologists
spondylosis, Cervical Pain, Health tips, rheumatoid arthritis, Hematologistsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्याच्या काळात सांधेदुखी हा आजार वाढताना दिसत आहे. अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा एक असामान्य व मणक्यावर सूज येणारा आजार आहे.

हे देखील पहा -

शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या अनियंत्रणामुळे आपल्याला सांधेदुखीचा आजार होऊ शकतो. ही प्रतिकारशक्ती आपल्या शरीरातील चांगल्या उतींवर परिणाम करुन पाठीच्या कण्यातील सांध्यावर सूज निर्माण करते. हा आजार गंभीर होत गेल्यास आपल्याला हृदय, डोळे व गुडघे दुखीच्या आजारामुळे शरीराच्या इतर भागाला नुकसान होण्याचा धोका वाढतो. या आजारावर वेळीच उपचार करायला हवा.

उपचारांना विलंब होण्याची कारणे

संधीवात सारख्या आजाराकडे आपण विशेष लक्ष देत नाही. तसेच याविषयी जनजागृती न केल्यामुळे आपल्याला त्याबद्दल योग्य माहिती देखील मिळत नाही. याला कारणीभूत ठरणारी गोष्ट म्हणजे आपल्याकडे विशेषज्ज्ञांची असलेली कमतरता.

पुणे येथील हेमेटोलॉजिस्ट डॉ. प्रवीण पाटील, एमआरसीपी, एफआरसीपी, सीसीटी म्हणतात या आजाराचे ०.५ टक्‍के रुग्ण भारतात आढळले आहे. आपल्याकडील संधीवात तज्ज्ञ अर्थात हेमेटोलॉजिस्टची संख्या अवघी १२००-१५०० इतकी असून यात बरीच तफावत आहे. सध्या प्रशिक्षणार्थी असलेले डॉक्टर्स आणि निधीपुरवठा करणा-या संस्था या सर्वांनाच या स्थितीविषयी अधिक जागरुक करण्याची गरज आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये सरकार हळूहळू काही अर्थपूर्ण पावले उचलत आहे, जिथे ३ जागा या तज्ज्ञ, डीएम हेमेटोलॉजिस्टसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.

spondylosis, Cervical Pain, Health tips, rheumatoid arthritis, Hematologists
सतत एकाच जागी बसल्यामुळे स्पाँडिलायसिसची समस्या उद्भवू शकते का ?

हेमेटोलॉजिस्ट हा एएसवरील उपचारांमध्ये पारंगत असतो आणि आजारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच त्यांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. याच्याकडून बायोलॉजिक्ससारख्या प्रगत उपचारपद्धतींचा वापर केला जातो. या आजाराच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणा-या पारंपरिक औषधोपचारांना प्रतिसाद न देणा-या रुग्णांच्या दृष्टीने हा शोध अधिकच महत्त्वाचा आहे.

हेमेटोलॉजिस्टची कमतरता कशी भरून काढता येईल

सध्या स्नायू व हाडांशी निगडित तसेच सांध्यांशी संबंधित आजारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. पंरतु, हे काही नवीन नाही. अनेक दशकांपासून या आजारांची लक्षणे आढळून आली आहेत पण, याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे त्याकडे सतत दुर्लक्ष केले जाते.

पॅरामेडिकल कर्मचारीवर्ग किंवा परिचारकांना प्रशिक्षण दिल्यास आपल्याला हेमेटोलॉजिस्टचे विशेष ज्ञान असलेले परिचारक मिळू शकतील, ज्यांची उपचार करणा-या डॉक्टरांना लक्षणीय मदत होऊ शकेल. याबरोबरच डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यासाठी खासगी संस्थांमध्ये फेलोशिपच्या रूपात विना-मान्यता ट्रेनिंग पोस्ट्सची संख्या वाढवता येईल. देशामध्ये एएसच्या उपचारांना बायोलॉजिक्ससारख्या आजार बळावण्याची प्रक्रिया धीमी करण्यासाठी मदत करणा-या आणि त्या वेदना कमी करणा-या प्रगत वैद्यकीय उपचारपद्धतींचे सहाय्य मिळेल असे डॉ. पाटील यांनी सुचविले आहे.

चेन्नई येथील कन्सल्टन्ट हेमेटोलॉजिस्ट डॉ. एम हेमा सांगतात, हेमेटोलॉजिस्ट विषयी प्रशिक्षण घेणारे हे खूप दुर्मिळ असतात. यामुळे भारतात त्याची अधिक कमतरता जाणवते. ऑटोइम्युन आजारांची संख्या वाढत असताना भारतामध्ये हेमेटोलॉजिस्टची गरजही वाढत आहे. रुग्णांच्या कल्याणाच्या दृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन हेमेटोलॉजिस्ट विभाग विकसित करणे त्यात गुंतवणूक करणे व त्याचबरोबर हे अभ्यासक्रम अधिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हेमेटोलॉजिस्टची संख्या वाढेल तसे रुग्णही या आजारांविषयी (Disease) अधिक जागरुक होती व त्यामुळे त्यांना योग्य निदान आणि उपचार प्राप्त करता येतील.

हेमेटोलॉजिस्ट चिकित्सा ही केवळ डॉक्टरांच्याच नव्हे तर फिजिओथेरपीस्ट्स, ऑक्युपेशनल थेरपीस्ट्स, नर्सेस, सायकोलॉजिस्ट्स आणि इतर कर्मचा-यांसारख्या पुरक आरोग्यकर्मींच्या (auxiliary health professionals -AHP) प्रशिक्षणावर आधारलेली असायला हवी.

अँकिलोजिंग स्पॉन्डिलायसिससारख्या आजाराच्या उपचारासाठी जीवनशैलीतील बदल, आरोग्यदायी आहार व डॉक्टरांनी (Doctor) सांगितलेल्या गोष्टीचे पालन केल्यास हा आजार बरा होऊ शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com