GPay Payment : आता येणार नाही 'Better luck next time'; याप्रकारे करा ट्राझेक्शन, मिळेल 5 ते 100 रुपयांचा कॅशबॅक !

हल्ली गुगल पे वरुन पेंमट केल्यानंतर आपल्याला Better luck next time असा कॅशबॅक मिळतोय का ?
GPay Payment
GPay PaymentSaam Tv

GPay Payment : भाजीवाला, किराणा, शॉपिंग सेटर, मॉल, फुड कोट, लाईट बिल यासारख्या अनेक ठिकाणी आपल्याला सहज पैसे ऑनलाईन पे करता येतात ते UPI पेंमेटच्या माध्यमातून. हल्ली यूपीआय हे सर्वसामान्याचे जगण्याचे कारण बनले आहे. २०२० च्या तुलनेतमध्ये युपीआय ट्राझेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सध्या डिलिटलमध्ये गुगल पे चा वापर अधिक लोक करतात. हे अॅप सहज हाताळता येते. गुगल पे चे तुम्ही पहिल्यांदा वापर करणार असणार तर तुम्हाला ५० ते १०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्ही तुमच्या मित्रपरिवाला तुमचा कोड वापरुन गुगल पे ओपन करायला सांगितले तर त्यातही तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो.

GPay Payment
UPI Payment: तुमचंही गुगल पे, फोन पे बंद होतं; NPCI नं दिलं स्पष्टीकरण

हल्ली गुगल पे वरुन पेंमट केल्यानंतर आपल्याला Better luck next time असा कॅशबॅक मिळतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही हमखास कॅशबॅक मिळवू शकाल. तसेच नवनवीन कुपन्स व ऑफर्स देखील मिळवू शकतात. गुगल पेमेंट अ‍ॅपवर विजिट केल्यानंतर आपल्याला काही प्लान पाहायला मिळतात.

गुगल पेमेंटमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत काही ऑफर्स देखील आहेत. यामध्ये तुम्हाला फक्त योग्य प्लान निवडायचा आहे तरच तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळू शकतो. विजेचे बिल, गॅसचे बिल, पेट्रोल बिल भरल्यानंतरही तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळेल. जर तुम्हाला चांगल्या कॅशबॅकची अपेक्षा असेल तर ही ट्रिक्स वापरुन पहा

1. वेगवेगळ्या अकाउंटवर पेमेंट करा

जर तुम्ही एकाच अकाउंटवरुन (Account) सतत पेमेंट करत असाल तर तुम्हाला कोणतीच ऑफर किंवा कॅशबॅक मिळणार नाही. जर तुम्ही मोठी रक्कम पाठवणार असाल तर तुमच्या वापरत नसणाऱ्या अकाउंट वरुन पाठवण्याचा प्रयत्न करा याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व कॅशबॅक देखील मिळेल.

2. मोठी रक्कम नको

बऱ्याचदा आपण एकाच वेळी मोठी रक्कम (Money) ट्रान्सफर करतो ज्यामुळे आपल्या गुगल पे जास्त कॅशबॅक देत नाही. पण तिच रक्कम आपण वेगळ्या अकाउंटवरुन ट्रान्सफर केल्यास कॅशबॅक मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com