UPI Payment: तुमचंही गुगल पे, फोन पे बंद होतं; NPCI नं दिलं स्पष्टीकरण

NPCI ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटलंय की....
UPI Payment
UPI PaymentSaam TV
Published On

नवी दिल्ली : गुगल पे, फोन पे, Paytm यासारख्या ऍप्सद्वारे यूपीआय प्रणालीचा वापर करुन तुम्ही पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत असाल, मात्र ते तुमचे प्रयत्न फोल ठरले असतील. आता याचं कारण समोर आलं आहे. आज रविवारी जवळपास एक तासाच्या कालावधीसाठी युपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface - UPI) सेवा बंद झाली होती. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India - NPCI) द्वारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली आता पुन्हा पुर्ववत झाली आहे.

NPCI ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटलंय की, "अधूनमधून येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे" ही सेवा काही वेळासाठी बंद पडली आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, "अधूनमधून येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे UPI युझर्सना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत. मात्र, UPI आता कार्यरत आहे आणि आम्ही सिस्टमचे बारकाईने निरीक्षण करत आहोत.

UPI सर्व्हर डाउन असल्याची तक्रार अनेक युझर्सनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केली होती. डिजिटल वॉलेट आणि ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म जसे की Google Pay आणि Paytm वापरून कोणतेही व्यवहार करता येत नव्हते. यासंदर्भात टेक समीक्षक नितीन अग्रवाल यांनी ट्विट केलं होतं की, "होय, ICICI बँकेने माहिती दिलीय की, त्यांची UPI सिस्टीम मेंटेनन्स अ‍ॅक्टिव्हिटींमुळे बंद आहे. मात्र, इतर अॅप्सबद्दल मात्र खात्रीलायक माहिती नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com