Schemes For Women : महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारच्या आहेत 'या' 5 योजना, जाणून घ्या त्याबद्दल

देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे.
Schemes For Women
Schemes For WomenSaam Tv
Published On

Schemes For Women : महिला या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. भारत हा विकसनशील अर्थव्यवस्थेकडून चांगल्या उत्पन्न देशाकडे कूच करतोय. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्पर्धा करत आहेत.

व्यवसाय, शिक्षण, मनोरंजन ते आयटी इत्यादी अनेक क्षेत्रात महिला आपला हक्क बजावत आहेत. दुसरीकडे, आजही देशात अशा महिलांची संख्या मोठी आहे, ज्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत या महिलांना पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांचा उद्देश देशातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या (Government) महिलांशी संबंधित या पाच उत्तम योजनांबद्दल जाणून घेऊया

Schemes For Women
Government Scheme : 'या' योजने अंतर्गत मुलीच्या जन्मावर पालकांना मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या

1. मोफत शिलाई मशीन योजना

देशातील मोठ्या लोकसंख्येमध्ये गरीब आणि मेहनती महिलांचा अधिक समावेश आहे. या महिलांना (Women) आयुष्यात लढण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकार देशातील प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे. शासनाच्या मदतीने महिलांना मोफत शिलाई मशीन मिळून स्वत:चा रोजगार सुरू करता येणार आहे.

2. सुकन्या समृद्धी योजना

ही एक छोटी बचत योजना आहे. मुलीचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी, तुमच्या मुलीचे खाते हे १० वर्ष होण्यापूर्वी उघडावे लागेल. या योजनेत तुम्ही किमान 250 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाबद्दल किंवा अभ्यासाबाबत चिंतामुक्त राहू शकता. अशा परिस्थितीत मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सर्वोत्तम पर्याय आहे. ही योजना मुलगी आणि तिचे पालक दोघांनाही मदत करते.

3. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

ही योजना भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. मुलींच्या लिंग गुणोत्तरातील घट थांबवणे आणि देशातील महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांनाही मदत करत आहे.

4. महिला शक्ती केंद्र योजना

या योजनेचा उद्देश महिलांना सक्षम करणे हा आहे. ही योजना 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत देशभरात सामाजिक सहभागातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले जात आहे.

5. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

देशात अजूनही महिलांची संख्या मोठी आहे ज्यांच्याकडे एलपीजी गॅस सिलिंडर नाही. या स्त्रिया आजही अन्न शिजवण्यासाठी लाकूड, शेणाची पोळी किंवा इतर साधनांचा वापर करतात. अशा स्थितीत स्वयंपाक करताना स्वयंपाकघरात धुराचे लोट येत असतात. त्यामुळे महिलांना स्वयंपाक करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही त्यांना घेरतात. महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com