Fake Loan Apps : गुगलची फेक लोन अ‍ॅप्सवर मोठी कारवाई, Play Store वरुन हटवले तब्बल 2,200 अ‍ॅप्स

Google Removes 2200 Apps : मित्रांकडे किंवा जवळच्या नातेवाईकांकडे आपण उधार पैसे मागताना अनेकदा विचार करतो. परंतु, मिनिटांत लोन उपलब्ध करुन देणारे कित्येक अॅप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यापैकी अनेक अ‍ॅप्स कागदपत्रे देखील मागत नाही.
Fake Loan Apps
Fake Loan AppsSaam Tv
Published On

Google Play Store Ban 2200 Apps :

मित्रांकडे किंवा जवळच्या नातेवाईकांकडे आपण उधार पैसे मागताना अनेकदा विचार करतो. परंतु, मिनिटांत लोन उपलब्ध करुन देणारे कित्येक अॅप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे. त्यापैकी अनेक अॅप्स कागदपत्रे देखील मागत नाही.

गरजेच्या वेळी अनेक लोक फेक लोनमधून कर्ज घेतात. मात्र यानंतर त्यांना अनेक मानसिक त्रासाला आणि धमक्या देणाऱ्या फोन कॉल्सला सामोरे जावे लागते. याप्रकरणांत ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते. काही अॅप्स (Apps) तुमचा वैयक्तिक डेटा देखील हॅक करतात. अशा फेक अॅप्सवर गुगलने (Google) मोठी कारवाई केली आहे.

युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन गुगलने प्ले स्टोअरवरुन तब्बल २,२०० फेक लोन (Loan) अॅप्स डिलीट केले. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुगलने एप्रिल 2021 ते जुलै 2022 या कालावधीत साधरणत: 3,500 ते 4,000 लोन अॅप्सची पुष्टी केली होती. यानंतर त्यातून २५०० अॅप्स डिलीट केले. यानंतर सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या काळात गुगलने २,२०० अॅप्स प्लेस्टोअरवरुन हटवले आहेत.

Fake Loan Apps
Samsung-OnePlus ची 'घडी विस्कटणार'? Apple चा फोल्डेबल फोन लवकरच लॉन्च होणार

1. गुगलच्या पॉलिसीत मोठा बदल

गुगलने आपल्या पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. आता रजिस्टर्ड कंपन्यांना किंवा त्यासोबत काम करणाऱ्या अॅप्सना प्ले-स्टोअरवर संधी मिळेल. देशातील वाढत्या लोन अॅप्समुळे गुगलने हा निर्णय घेतला आहे.

2. काळजी काय घ्याल?

  • जर तुम्ही अॅप्सवरुन लोन घेत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरुनच डाऊनलोड करा.

  • त्या अॅप्सची पुरेपूर माहिती घ्या. ते अॅप्स आरबीआयकडे रजिस्टर आहेत की, नाही हे तपासा. तसेच अशा अॅप्सना खासगी माहिती देऊ नका.

  • लोन अॅप्सवरुन फसवणूक झाल्यास लगेच सायबर पोलीस किंवा बँकेशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com