Gold-Sliver Price Today oct 21, 2022 : धनत्रयोदशीनिमित्त सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा

दिवाळीच्या काळात अनेक शुभ मुहूर्त असल्यामुळे सोन खरेदी करणं शुभ मानलं जातं.
Gold-Sliver Price
Gold-Sliver PriceSaam Tv

Gold-Sliver Price Today oct 21, 2022 : सणासुदीच्या काळात सोने हमखास खरेदी केले जाते. दिवाळीच्या काळात अनेक शुभ मुहूर्त असल्यामुळे सोन खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच यानंतरच्या काळात लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे सोने खरेदीत वाढ होत आहे.

सोन्याचे भाव कधी उच्चांक गाठतात तर कधी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे असतात. आज आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजरातील सोन्या-चांदीच्या दरांमध्ये बदल झाले आहेत.

Gold-Sliver Price
Gold-Silver Price Today, Oct 20, 2022: धनयत्रोदशीच्या आधी सोनं खरेदी करणं परवडेल? जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे भाव

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,350 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,560 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 561 रुपये आहे. (gold silver price update 21 october 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  1. चेन्नई - 51,110 रुपये

  2. दिल्ली - 50,730 रुपये

  3. हैदराबाद - 50,560 रुपये

  4. कोलकत्ता - 50,730 रुपये

  5. लखनऊ - 50,950 रुपये

  6. मुंबई - 50,560 रुपये

  7. नागपूर - 50,590 रुपये

  8. पुणे - 50,590 रुपये

Gold-Sliver Price
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने का खरेदी केले जाते? जाणून घ्या, त्यामागची कथा

धनत्रयोदशीला सोने का खरेदी करावे ?

धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि जर कोणी सोने खरेदी करू शकत नसेल तर चांदी, पितळ किंवा स्टील देखील खरेदी करू शकतो. परंतु या चार धातूंपैकी कोणताही एक धातू विकत घेण्याची परंपरा आहे. पण सोने खरेदी करणे सर्वात शुभ का मानले जाते?

खरे तर सोने अत्यंत शुद्ध मानले जाते आणि असे मानले जाते की, सोन्यात धनाची देवी लक्ष्मीचा वास असतो. तसेच दिवाळीमध्ये अनेक मुहूर्त असतात. तसेच या काळात सोने व चांदीमध्ये गुंतवणूक करणे अधिक चांगले असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com