तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. भारतीयांमध्ये सोन्यामधील गुंतवणूक खूपच प्रसिद्ध आहे. मात्र, सोन्याच्या गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. सोन्याच्या दागिन्यामधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे जाणून घेऊयात. (Latest Marathi News)
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय लोकांकडे जगाच्या तुलनेत ११ टक्के सोने आहे. जगातील ११ टक्के सोन्याची भारतीयांनी खरेदी केली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, टॉप - १० लिस्टमध्ये असलेल्या भारताकडे ८००.७८ टन सोने आहे. टॉप-१० च्या क्रमवारीत भारत नवव्या स्थानावर आहे. फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे ४ नुकसान आहेत. तसेच काही फायदे देखील आहेत.
तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर तुम्ही एक प्रकारे गुंतवणूकच करत आहात. अडचणीच्या वेळी सोन्याची गुंतवणूक फायदेशीर ठरते. यामुळे अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं जातं.
मेकिंग चार्ज
तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर, १० टक्के मेकिंग चार्ज द्यावे लागतात. दागिने तयार करण्याची ऑर्डर दिली तर ज्वेलर्सला मेकिंग चार्ज द्यावे लागतात. ही रक्कम ज्वेलर्सला द्यावी लागते. त्यामुळे मेकिंग चार्जसाठी खिशातून जास्तीचे पैसे द्यावे लागतात.
तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर तुम्हाला ३ टक्के जीएसटी द्यावी लागते. तुमच्याजवळ जीएसटी इनपूट नसेल तर तुम्ही दागिन्यामध्ये गुंतवणूक करून अधिक खर्च करत आहात. त्यामुळे अशा प्रकारची गुंतवणूक चांगली मानली जात नाही.
तुम्ही खूप सारं सोने खरेदी करू इच्छित असाल,तर तुम्हाला चांगल्या स्थितीत कुठे ना कुठे ठेवावे लागते. सोन्याचे दागिने तुम्ही बँकेचे लॉकर, घरातील तिजोरीमध्ये ठेवता. घरात दागिने ठेवत असाल चोरी होण्याचीही शक्यता असते.
तुम्ही ज्वेलर्सकडून सोन्याची खरेदी करत असाल तर तो शुद्ध सोने देत आहे की हॉलमार्कचे सोने देत आहे, याबाबत नेहमी चिंता असते. तज्ज्ञांच्या मते फिजिकल गोल्डमध्ये अधिक खर्च करू नये. फिजिकल गोल्डऐवजी गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड), गोल्ड फंड किंवा डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक चांगली मानली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.