तुमच्या चष्म्याला म्हणा बाय बाय; ऑपरेशनशिवाय निघून जाणार आता डोळ्यांचा नंबर? कसा पाहा!

कॉन्टॅक्ट लेन्स किंवा काही शस्त्रक्रिया न करता तुम्ही आता केवळ आय ड्रॉपने चष्मा सोडवू शकणार आहात. केवळ एक थेंब आय ट्रॉप टाकताच, 15 मिनिटांत तुमची दृष्टी परत येऊ शकेल. भारतातील औषध नियंत्रक, ड्रग्ज कंट्रोलर जनरलने भारतातील पहिल्या आय ड्रॉपला मान्यता दिली आहे.
eye drops
eye dropssaam tv
Published On

चष्मा असलेल्या व्यक्तीसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात लवकरच एक असा आय ड्रॉप येणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा चष्मा सोडवू शकता. DCGI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने एका नव्या आय ड्रॉपला मान्यता दिली आहे. मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने पायलोकार्पिन वापरून बनवलेले “प्रेस्वू” आय ड्रॉप्स लाँच केलंय.

मुंबईमध्ये असलेल्या या कंपनीने मंगळवारी सांगितलं की, प्रेस्वू आय ड्रॉपसाठी अंतिम मंजूरी मिळाली असून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात लाँच करण्याचा विचार करतायत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे औषध डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार कमी करून 'प्रेस्बायोपिया'वर उपचार करतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट जवळून पाहण्यासाठी ही पद्धत मदत करते. अशातच चष्मा असणाऱ्या व्यक्तींना या ड्रॉपचा फायदा होणार असल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रेस्बायोपिया?

एन्टोड फार्मास्यूटिकल्सने प्रेस्बायोपियावर उपचार व्हावेत यासाठी प्रेस्वू आय ड्रॉप तयार केले आहेत. प्रेस्बायोपियामुळे जगभरात जवळपास 1.09 अब्ज ते 1.80 अब्ज लोक प्रभावित असल्याची माहिती आहे. प्रेस्बायोपिया वयानुसार वयाच्या ४० नंतर नैसर्गिकरित्या उद्भवते, ज्यामुळे जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहण्यात अडचण येऊ शकते.

दरम्यान याबाबत मुंबईतील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, या औषधात काही टेक्नलॅाजी वापरली गेली आहे. त्यामुळे हे ड्रॉप डोळ्यात टाकल्याने बाहुली कमी होते आणि आपल्याला दिसू लागतं. एकदा ड्रॉप टाकला तर ६ तास आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं. काही वेळाने पुन्हा ड्रॉप वापरल्यास ९ तासापर्यंत दिसू शकतं.

काय आहेत औषधाचे दुष्परिणाम?

पण या औषधाचे काही साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत. हे औषध वापरल्यानंतर डोकेदुखी, डोळे लाल होणं अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे डॅाक्टरांच्या सल्लाने ते औषध वापरावं. ४० वर्षां पुढील लोकांना जवळचं वाचण्यासाठी हे औषध वापरलं पाहिजे. सामान्य माणसाला परवडतील असे ह ड्रॉप्स आहेत. ५ ते १० टक्के लोकांना चष्मा नको असतो. त्यामुळे त्या लोकांना हे औषध फायदेशीर ठरू शकतं. जवळच्या दृष्टीसाठी झालेली ही पहिली क्रांती आहे. भारतीय कंपनीने याची क्रांती त्याचा मला अभिमान आहे, असंही डॉ. लहाने यांनी सांगितलंय.

eye drops
Cancer risk: तुम्ही उंच आहात, तर तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; संशोधकांचा धक्कादायक दावा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com