Game of Names : नावात काय आहे ? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे बारसे होईपर्यत त्याला अनेक टोपणनावाने ओळखले जाते. परंतु, हल्लीच्या काळात बाळाचे (Baby) नाव ठेवायचे म्हटले की विशेष आनंद असतो.
हल्लीच्या काळात मुलांची नावं ठेवताना आपण जास्त विचार न करता आपल्या नावांचे एकत्रीकरण करून नावं ठेवतो. अशीच काही नावं अर्थहीन असतात.
आपल्याकडे देवादिकांची नावे मुलांसाठी ठेवली जायची. मुलगा असेल तर शंकर , गणेश, राम, लक्ष्मण, हरी, कृष्ण, नारायण, आणि मुलगी असेल तर सीता,जानकी, रुक्मिणी, पार्वती, उमा, लक्ष्मी, सरस्वती, वगैरे. त्यामागे कदाचित देवाचे नाव सतत तोंडी यावे अशी रीतसर भावना असावी.
गुलाबाला कुठलेही नाव दिले तरी त्याचा सुगंध तितकाच गोड असेल हे शेक्सपिअरचे विख्यात वाक्य आहे. पण व्युत्पत्तीचा विचार केला तर नावांमागील अनेक गंमती जमती पुढे येतात.
शलाका हे नाव ऐकायला किती गोड आहे असे वाटते पण शब्दाचा अर्थ लोखंडाची सळी असा होतो. तसेच अनामिका म्हणजे जिला नावचं नाही अशी विपरीत नावे सध्याच्या काळात ठेवली जातात. मुलाचे नाव अनिकेत ठेवले जाते पण याचा अर्थ ज्याला घर नाही किंवा ज्याला आसरा नाही असे होते.
काही नावाना फार रंजक इतिहास सुद्धा असतो. त्या ऐतिहासिक व्यक्तीचे नाव जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपण त्या नावाला काही वेळेस पात्र ठरतही नाही. जसे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकले की भारदस्त असल्यासारखे वाटते पण तेच नाव सामान्य व्यक्तीसाठी आपण खूप विचार करतो की हे नाव का दिले असावे. तसेच काहीसे रावण आणि दुर्योधन यासारखे राक्षसी पराक्रमी असणाऱ्या लोकांचे नाव आपण केव्हाही ठेवलेले पाहिले नसेलचं.
नावाच्या या अशा अनेक गंमती-जमती आहेत. ज्यामुळे शाळेत (School), कॉलेज किंवा आपल्या प्रोफेशनल ठिकाणी त्याचा हास्यकल्लोळ होतो किंवा लोकांना त्याचे अप्रूप वाटते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.