Mental Health: वारंवार इतरांवर चिडचिड किंवा रागावताय? तुम्हीच तुमचं मानसिक आरोग्य आणताय धोक्यात!

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडण्यामागे अनेकदा राग किंवा संताप देखील कारणीभूत ठरू शकतो.
Mental Health
Mental Healthsaam tv
Published On

संताप, राग आणि चिडचिड यांचं प्रमाण सद्या बरंच वाढलं आहे. धकाधकीच्या जीवनामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आणि आव्हानात्मक आहे. जवळपास राग ही भावना आपल्याला दररोज सामोरं जावं लागतं. मानसिक आरोग्य बिघडण्यामागे अनेकदा राग किंवा संताप देखील कारणीभूत ठरू शकतो. पण रागाचा मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो हे पाहूयात.

मुळात राग ही आपल्या मनात निर्माण होणारी एक भावना आहे. यामध्ये मेंदूतील एक छोटा बदामाच्या आकाराचा भाग (amygdala) आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला मदत करतो. यावेळी हा भाग तिथल्या आजूबाजूची परिस्थिती धोकादायक आहे का, याची माहिती घेतो. परिस्थिती थोडीशी जारी धोकादायक असल्याचं जाणवलं तर आहे असे जाणवले तरी amygdala उत्तजित होतो असं दिसतं.

Mental Health
Mental Health in Workplace: तुम्हालाही ऑफिसमध्ये वर्कलोड आहे? तज्ज्ञांचा हा सल्ला करेल टेन्शनमुक्त

यावेळी हा भाग आपल्या रक्षणासाठी मनात राग निर्माण करतो. मेंदूतील सर्वात पुढचा मोठ्या मेंदूचा भाग (prefrontal cortex) यांच्यामध्ये Amygdala चेतातंतू दुवा निर्माण करतात. त्या आधारे आलेला राग लक्षात घेऊन prefrontal cortex आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. सर्वसाधारणपणे रागाच्या भरात आपल्या हातून काही चुकीचं होऊ देत नाही.

मेंदूतील काही रसायनांचं प्रमाण राग आला की वाढू लागतं. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके तसंच रक्तबादातही वाढ होते. राग ही भावना वेगवेगळ्या वेळेस निर्माण होते. मुळात अनेकांच्या म्हणण्यानुसार, आपल्या अपेक्षेप्रमाणे काही घडलं नाही की राग येतो.

सतत रागामुळे उद्भवणाऱ्या समस्या

जर तुम्हाला वारंवार राग येत असेल तर तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या तसंच हृदयाच्या समस्याही दिसून येतात. सततच्या रागामुळे नैराश्य येत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे मानसिक समस्यांमध्ये राग येणं हे एक प्रमुख लक्षणं दिसून येतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com