Foods For Healthy Pancreas : हा आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्या, स्वादुपिंड मजबूत करण्यासाठी हे पदार्थ खा

स्वादुपिंडाच्या आरोग्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.
Foods For Healthy Pancreas, Daily Food
Foods For Healthy Pancreas, Daily FoodSaam Tv

Foods For Healthy Pancreas : स्वादुपिंड हा पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पोटाला मिळालेल्या अम्लीय अन्नाचे नियमन आणि तटस्थ करण्याचे कार्य हा करतो. तसेच कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि लिपिड्सच्या पचनास मदत करते.

हे देखील पहा -

स्वादुपिंडाची मुख्य दोन कार्ये आहेत. पहिले ते पचनास मदत कराणे पदार्थ तयार करते व दुसरे शरीरात हार्मोन्स निर्माण करुन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. स्वादुपिंडाच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यात कोणतीही खराबी अनेक गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकते. ते खराब झाल्यामुळे किंवा नीट काम न केल्यामुळे आपल्याला मधुमेह, हायपरग्लायसेमिया, स्वादुपिंडाचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. दररोज खाल्लेले अनेक पदार्थ स्वादुपिंडाच्या आरोग्यावर परिणाम करतात. कोणते पदार्थ खायला हवे व कोणते टाळायला हवे हे जाणून घेऊया.

१. हळदीला अनेकदा नैसर्गिक दाहक-विरोधी एजंट म्हणून ओळखले जाते, जे स्वादुपिंडातील जळजळीमुळे होणारी वेदना कमी करण्यास मदत करते. इतकेच नाही तर ते स्वादुपिंडात इन्सुलिनचे उत्पादन उत्तेजित करते जे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि मधुमेह (Diabetes) रोखण्यास मदत करते.

Foods For Healthy Pancreas, Daily Food
Health food for mood swings : अचानक भूक लागते? मूड खराब झाला आहे? तर या पदार्थांचे सेवन करा मिनिटांत होईल बदल

२. लसूण नैसर्गिक प्रतिजैविक आहे. जेव्हा ते विविध पदार्थांसोबत एकत्र केले जाते तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. लसूण मध, कांदा, मेथी इत्यादी व्यतिरिक्त वापरता येते. याचे संयोजन स्वादुपिंडासह विविध अंतर्गत अवयवांच्या ऊतींची दुरुस्ती करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करते.

३. पालक ही जीवनसत्त्व (Vitamins) ब आणि लोहाने समृद्ध असलेली भाजी आहे. याच्यामुळे आपल्या स्वादुपिंडाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. लोह जळजळ टाळण्यास मदत करते आणि बी जीवनसत्त्वे स्वादुपिंडाचे पोषण करतात. याचे सेवन केल्यास स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका टळतो.

४. ब्रोकोली आणि इतर क्रूसीफेरस भाज्या जसे की कोबी, फ्लॉवर आणि काळे त्यांच्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात जे स्वादुपिंडातील कर्करोगाच्या पेशींशी लढतात. आपल्या शरीरातील अवयन तंदुरुस्त व रोगमुक्त ठेवण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com