Home Remedies For Body Odor : उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने अंगाला दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे अनेकवेळा लोकांसमोर लाजिरवाणे व्हावे लागते. दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी लोक या ऋतूमध्ये डिओडोरंट्स आणि परफ्यूम्सचा वापर करतात.
परंतु कधीकधी त्यांच्या सुगंधाचाही शरीरातून (Body) येणाऱ्या दुर्गंधीवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे आज आम्ही या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत. जो तुम्ही एकदा वापरून पहा.
लिंबाचा रस -
लिंबू अँटी-सेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे दुर्गंधी निर्माण करणार्या बॅक्टेरियाची वाढ कमी करण्यास मदत करते. तर यासाठी अर्धे लिंबू घ्या आणि ते तुमच्या अंडरआर्म्सवर हलक्या हाताने चोळा. थोडा वेळ तसाच राहू द्या आणि मग आंघोळ करा. दुसरा उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात (Water) लिंबू पिळणे, त्यामुळे शरीरातून लिंबाचा ओला वास येतो.
अॅपल सायडर व्हिनेगर -
अॅपल सायडर व्हिनेगर आम्लयुक्त आहे आणि त्याच वेळी ते अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे. ज्यामुळे ते बॅक्टेरिया नष्ट करून अंडरआर्म्समधील पीएच पातळी कमी करते. याच्या वापराने शरीराची दुर्गंधी बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. यासाठी अॅपल (Apple) सायडर व्हिनेगरमध्ये कापसाचा गोळा बुडवा आणि नंतर आपल्या अंडरआर्म्सवर लावा. दिवसातून 2 वेळा वापरा.
टोमॅटोचा रस -
टोमॅटोच्या रसामध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, जे शरीराच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी आहेत. जर तुम्हाला अंडरआर्म्समध्ये खूप घाम येत असेल तर तिथे टोमॅटोचा छोटा तुकडा चोळावा, ही समस्या दूर होऊ शकते. तसेच दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया आणि संक्रमण प्रतिबंधित करते. टोमॅटोचा रस काढून त्यात कापसाचा गोळा भिजवून अंडरआर्म्सवर लावा.
कडुलिंबाची पाने -
शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी कडुलिंब हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. अँटी-सेप्टिक, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवा. त्यात थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.