Foot Odor Causes : अनेक व्यक्ती पायांमधून येणाऱ्या दुर्गंधापासून ग्रस्त असतात. करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वापरतात. तरीसुद्धा पायांमधून येणारा दुर्गंध निघून जायचं नाव घेत नाही.
बऱ्याचवेळी पायांमधून येणाऱ्या वासामुळे अनेक व्यक्तींना दुसऱ्यांसमोर लाज वाटते. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय वापरून पायाच्या दुर्गंधापासून मुक्ती मिळवू शकता. हे घरगुती (Home) उपाय दुर्गंध मिटवून तुमच्या पायांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया त्या घरगुती उपायांबद्दल.
विनेगर -
विनेगर हे पायांच्या दुर्गंधापासून मुक्ती देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विनेगरच्या वापरामुळे बॅक्टेरिया नष्ट होतो आणि पायांमधून येणारा दुर्गंध देखील नाहीसा होतो. याचा वापर करण्यासाठी सहा ते आठ कप गरम पाण्यामध्ये (Water) एक कप विनेगर मिसळावा. आता या मिश्रणामध्ये दहा ते वीस मिनिटे तुमचे पाय बुडवून ठेवा. असं केल्याने पायांना येणाऱ्या दुर्गंध लवकरात लवकर नाहीसा होतो.
टी बॅग्स -
टी बॅग्सच्या वापरामुळे पायांचा दुर्गंध लवकरात लवकर नाहीसा होण्यास मदत होते. याचा वापर करण्यासाठी चार ते पाच टी बॅग्स एक लिटर गरम पाण्यामध्ये मीक्स करा. त्यानंतर या मिश्रणामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय टाकून बसा. केल्याने पायांवरील जंतू नष्ट होतील आणि पायांचा दुर्गंध येण्याचे थांबेल.
बेकिंग सोडा -
बेकिंग सोड्याच्या वापराने पायांना येणार दुर्गंध लवकरात लवकर नाहीसा केला जाऊ शकतो. याचा वापर करण्यासाठी एक टप पाण्यामध्ये ते दोन तुमचे बेकिंग सोडा मिक्स करा. या मिश्रणामध्ये पाच ते दहा मिनिटे पाय बुडवून बसा. असं केल्याने तुमचे पाय मुलायम होतील सोबतच दुर्गंध सुद्धा नाहीसा होईल.
मिठाचे पाणी -
मिठाच्या पाण्याने अगदी सहजपणे पायांचा देणारा दुर्गंध नाहीच केला जातो. यासाठी तुम्हाला एक टप पाण्यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घालायचे आहे. त्यानंतर पाय त्या टपामध्ये बुडवून बसायचे आहे. असं केल्याने तुमच्या पायाचा दुर्गंध मिटून जाईल.
मक्याचे पीठ -
मक्याचे पीठ वापरून तुम्ही तुमच्या पायांना दुर्गंधापासून मुक्त करू शकता. याचा वापर करण्यासाठी तुमच्या पायांवरती मक्याचे पीठ झटका. सोबतच घाम येणे बंद होईल आणि दुर्गंध सुद्धा येणार नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.