Wedding Palace : लग्नासाठी फिल्म स्टारची पहिली पसंद राजस्थानमधील 'या' किल्ल्यांना !

Wedding Destination : आज आम्ही तुम्हाला अशा काही किल्ल्यांबद्दल सांगणार आहोत जे लग्न करण्यासाठी फिल्म स्टारचे पसंतीचे आहे.
Wedding Palace
Wedding PalaceSaam Tv

Wedding Palace : नुकतेच लग्न बंधनात अडकलेले बॉलीवूड कपल सिद्धांत मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाह सध्या चर्चेत आहे. हा विवाह राजस्थान मधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये राजेशाही थाटात पार पडला. लोकांनी वेडिंग व्ह्यूबद्दल बरीच चर्चा केली.

राजस्थान येथील जैसलमेरचे सूर्यगड पॅलेस त्याच्या सौंदर्यासाठी देश परदेशात प्रसिद्ध आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. तुम्हालाही असे राजेशाही थाटात लग्न करायचं असेल तर, आज आम्ही तुम्हाला अशा काही किल्ल्यांबद्दल सांगणार आहोत जे लग्न (Wedding) करण्यासाठी फिल्म स्टारचे पसंतीचे आहे.

Wedding Palace
Pre-Wedding Shoot : प्री-वेडिंग शूटसाठी भारतातील ही ठिकाणी ठरतील आकर्षक !

1. उम्मेद भवन पॅलेस

राजस्थान येथील जोधपुर मधील उम्मेद भवन पॅलेस बऱ्याच काळापासून शाही विवाह सोहळे आयोजित करत आहेत. हा राजवाडा देश-परदेशात अतिशय प्रसिद्ध आहे. तलाव, नाचणाऱ्या मोरांनी वेढलेला हा राजवाडा सोबतच हिरव्यागार बागा आहेत. बॉलीवुड फिल्म स्टार प्रियांका चोप्राने हॉलीवुड स्टार जोनास सोबत उम्मेद भवन या पॅलेस मध्ये हिंदू रितिरिवाजांनुसार लग्न केले.

2. लेक पॅलेस,उदयपूर

उदयपूर येथील लेक पॅलेस भारतातील टॉप वेडिंग च्या यादीत समाविष्ट आहे. लेक पॅलेस मध्ये भारतातील अनेक मोठ्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. उदयपूर मध्ये अनेक पॅलेस आहेत परंतु लेक पॅलेस हे फार प्रसिद्ध आहे, 'ये जवानी है दिवाने' या चित्रपटाचे (Movie) शूटिंग याच पॅलेस मध्ये झाली आहे.

Wedding Palace
Honeymoon Travel Place : हनीमूनसाठी बेस्ट ठरतील महाराष्ट्रातील 'ही' 5 पर्यटनस्थळे, जाणून घ्या

3. मुंडोटा किल्ला, जयपूर

राजस्थान येथील जयपुर मधील पिंक सिटीत असलेला मुंडोटा किल्ला सुमारे पाचशे वर्षे जुना किल्ला आहे. हा किल्ला त्याच्या सौंदर्यासाठी फार प्रसिद्ध आहे. १४ व्या शतकात राजपुतानी हा किल्ला नारूका म्हणून बांधला होता. हा किल्ला अरवली पर्वतरांगांच्या माथ्यावर असल्यामुळे त्याच्या सौंदर्याने सर्वांचे मन जिंकते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये साउथची अभिनेत्री हंसिका मोटवानी यांचा या किल्ल्यावर विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

4. नीमराना फोर्ट पॅलेस अलवर

राजस्थानमधील सर्वात ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक, नीमराना फोर्ट पॅलेस आहे.हे पॅलेस राजस्थान अलवार जिल्ह्यातील प्रसिद्ध राजवाडा आहे. शाही विवाहसोहळयासाठी हे खूप सुंदर ठिकाण आहे. रोमन एम्फीथिएटर, हँगिंग गार्डन्स यासारख्या अनेक आकर्षणांनी समृद्ध असलेला, नीमराना फोर्ट पॅलेस 2.5 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. तसेच येथे 50 खोल्या आहेत, ज्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.

Wedding Palace
Weekend Travel Tips : विकेंड ला फिरायचा प्लॅन करताय? मग थालिसेन शहराला नक्की भेट द्या!

5. बरवडा रिसॉर्ट, सवाईमाधोपूर

राजस्थानमधील बरवडा रिसॉर्ट हे रॉयल डेस्टिनेशन वेडिंगसाठीही प्रसिद्ध ठिकाण आहे. येथिल बरवडा किल्ला सर्वसामान्यच नाही तर खास लोकांची पहिली पसंत आहे. गेल्या वर्षी बॉलीवूडचे जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफने येथेच लग्नगाठ बांधली होती. तुम्हाला जर शाही पद्धतीने विवाहसोहळा करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com