Bail Pola 2022
Bail Pola 2022Saam Tv

Bail Pola 2022 : सर्जा-राजाचा सण बैलपोळा कधी आहे ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

बैलपोळा कधी आहे ?
Published on

Bail Pola 2022 : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. शेतकरी वर्ग हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करुन गावभर मिरवणूक काढली जाते. ज्या व्यक्तींच्या घरी बैल नसतात ती व्यक्ती मातीच्या बैलांची पूजा करुन हा सण साजरा करतात.

महाराष्ट्रात हा सण दरवर्षी पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो. परंतु, यावर्षी हा सण २६ ऑगस्टला साजरा केला जाईल. वर्षभर राबणाऱ्या बैलाला या दिवशी शेती व नांगरापासून दूर ठेवले जाते.

या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांना विविध वस्त्रांनी व दागिन्यांनी त्यांना नटवले जाते. मनोभावे पूजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घातला जातो व त्यांची गावात मिरवणूक काढली जाते.

महत्त्व -

सरत्या श्रावणाच्या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती व्यवसायावर अवलंबून असणारा हा सण शेतकऱ्यासाठी अधिक महत्त्वाचा असतो. बैलपोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करतात. बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य करुन बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

Bail Pola
Bail Pola Internet

कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

बैलपोळा सण (Festival) प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा भागात देखील पोळा साजरा केला जातो.

तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा (Bailpola) सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते. तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. मध्य आणि पूर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये प्रामुख्याने हा सण साजरा केला जातो. भारतात इतर काही ठिकाण देखील पोळा साजरा केला जातो. दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com