Weakness : अचानक थकल्यासारखे वाटतेय ? 'या' पदार्थांचे सेवन करा

उर्जा पातळी कमी झाली तर थकवा जाणवतो.
Weakness
Weakness Saam Tv
Published On

Weakness : उर्जा पातळी कमी झाली तर थकवा जाणवतो. जर तुम्हाला हिवाळ्यात जास्त थकवा येत असेल तर या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला झटपट एनर्जी मिळेल. शरीर सक्रिय आणि निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी ऊर्जा खूप महत्त्वाची आहे.

शरीरात पुरेशी उर्जा असेल तर आपण शरीर आणि मनाने सर्व कामे करू शकतो. दुसरीकडे, ऊर्जा पातळी कमी झाल्यास आपल्याला थकवा जाणवतो. जर तुम्हाला हिवाळ्यात जास्त थकवा येत असेल तर या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला झटपट एनर्जी मिळेल. (Health)

Weakness
Weak Heart Symptoms : तुम्हाला देखील 'ही' लक्षणे जाणवताय ? येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

बदाम -

बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. बदाम हा जगभरात चांगला स्नॅक मानला जातो.

हंगामी फळे -

हंगामी फळांचे सेवन करूनही तुम्ही झटपट ऊर्जा घेऊ शकता. मोसमी फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे जळजळ दूर करतात, ज्यामुळे शरीरात कमजोरी सुरू होते.

Weakness
Winter Health Tips : सोयाबीनच्या भाजीचा हिवाळ्यात वापर केलात, तर त्वचा चमकेल शिवाय बद्धकोष्ठता समस्यांपासूनही होईल सुटका

हर्बल चहा किंवा कॉफी -

शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही हर्बल चहा किंवा कॉफी घेऊ शकता. वास्तविक, कॉफीमध्ये कॅफिन आढळते जे तुम्हाला सतर्क करते.

लिंबूपाणी -

जर तुम्हाला अचानक थकवा किंवा चक्कर येत असेल तर तुम्ही एक ग्लास लिंबूपाणी पिऊ शकता. लिंबाच्या पाण्यात चिमूटभर मीठ आणि साखरही टाकू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखले जाईल आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com