Winter Health Tips : सोयाबीनच्या भाजीचा हिवाळ्यात वापर केलात, तर त्वचा चमकेल शिवाय बद्धकोष्ठता समस्यांपासूनही होईल सुटका

थंडीचा हंगामात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या मौसमी आजारांना सामोरे जावे लागते.
Health Tips
Health Tips Saam Tv

Health Tips : थंडीचा हंगाम आला आहे. या ऋतूमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या मौसमी आजारांना सामोरे जावे लागते. रोगप्रतिकारक शक्ती योग्य ठेवण्यासाठी आपण आपले खाणेपिणे योग्य ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य (Health) तज्ज्ञांचे मत आहे की हिवाळ्यात मिळणारे बीन्स तुम्हाला अनेक आजारांपासून (Disease) वाचवतात. सोयाबीन केवळ प्रतिकारशक्तीवरच नाही तर शरीरातील वाढत्या चरबीवरही प्रभाव दाखवतात. चला जाणून घेऊया बीन्सबद्दल आणि कोणत्या रोगांवर त्यांचा प्रभाव असतो.

सोयाबीनचे फायदे -

१. सोयाबीनमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे याला आरोग्याचा खजिना म्हटले जाते. तांबे, लोह, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसह अनेक पोषक तत्वे बीन्समध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता टिकून राहते आणि थंडीच्या थरकापापासून वाचतो. याच्या वापरामुळे शरीरात लोहाची कमतरता नसते आणि अॅनिमियाचा धोका कमी होतो.

Health Tips
Winter Health Care : हिवाळ्यात सर्दी-खोकला होतोय ? तर, 'या' सुपरफूड्सला करा डाएटमध्ये सामील !

२. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन बी 6, नियासिन आणि पॅन्टोथेनिक ऍसिड देखील असतात. अनेकांना रात्री झोप येत नाही. बीन्समध्ये आढळणारे मॅग्नेशियम निद्रानाश आणि थकवा दूर करते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे तुम्हाला काम केल्यासारखे वाटते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे होते.

Health Tips
Winter Health Tips : सर्दी-खोकल्यात चुकूनही खाऊ नका 'ही' फळे, घश्याला आणखी त्रास होण्याची शक्यता

३. चुकीच्या आहारामुळे लोकांमध्ये पोटाशी संबंधित अनेक समस्या दिसून येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की बीन्समध्ये भरपूर फायबर आढळते. त्यामुळे पोटातील गॅसची समस्या आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. बीन्समुळे शरीरातील वाढता लठ्ठपणाही कमी होतो.

४. सोयाबीन खाल्ल्याने त्वचेशी संबंधित आजार कमी होतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. यासोबतच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com