Carl Pei Launches New Brand : मोबाईल युजर्ससाठी गुड न्यूज, OnePlus आणि Nothingनंतर आणखी एका नव्या ब्रँडचे उद्घाटन; स्वस्त दरात मिळणार डिव्हाइसेस

Ex Oneplus Ceo : कार्ल पेईने CMF बाय नथिंग लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
Carl Pei Launches New Brand
Carl Pei Launches New BrandSaam Tv
Published On: 

CMF By Nothing : टेक जगतातील एक मोठे नाव असलेल्या कार्ल पेईने सर्वप्रथम OnePlus या टेक ब्रँडचा पाया घातला आणि नंतर त्यांचा नथिंग ब्रँड चांगलाच मार्केटमध्ये धमाल करत आहे. आता त्यांनी 'CMF' नावाची आणखी एक कंपनी स्थापन केली आहे आणि ती केवळ टेक डिव्हाइसेस लॉन्च करणार आहे. कार्लने म्हटले आहे की ही कंपनी 'उत्तम डिझाइन अधिक सुलभ'बनवेल. या वर्षाच्या अखेरीस ब्रँडची सुरुवातीची उत्पादने सादर केली जातील.

यूट्यूबवर कम्युनिटी अपडेटमध्ये पोस्ट केलेल्या अपडेटनुसार, कार्ल पेईने सीएमएफ बाय नथिंग लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा एक उप-ब्रँड आहे ज्याचा उद्देश उत्पादनांची नवीन श्रेणी तयार करणे आहे जे वापरकर्त्याचा अनुभव चांगल्या डिझाइनसह वाढवेल. तसेच CMF कडे Nothing सारखी अद्वितीय रचना असलेली कंपनी (Company) असल्याचे सांगितले. आता या नवीन डिव्हाइसेसची रचना कशी असेल हे पाहणे खूप मनोरंजक असेल.

Carl Pei Launches New Brand
Nothing Phone 2 Launched: आला रे आला, 50MP कॅमेरासह 512GB स्टोरेजचा नवा फोन ! जाणून घ्या किंमत व फीचर्स

कार्ल पेईच्या मते, नथिंग आणि सीएमएफच्या वेगळ्या भूमिका असतील. प्रीमियम आणि युनिक डिझाइनसह नथिंग असे फोन बनवतील. त्याच वेळी, CMF Buy Nothing असे उपकरण बनवणार आहे जे कमी किंमतीत येतात जेणेकरून अधिकाधिक वापरकर्ते ते खरेदी करू शकतील. पेईच्या मते, सीएमएफ बाय नथिंग सब-ब्रँडची टीम पूर्णपणे वेगळी असेल.

नथिंग प्रोडक्ट तपशील

नथिंग इअर 2 आणि नथिंग इअर स्टिक ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरबड्सची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 4,999 रुपये आहे. दुसरीकडे, नथिंग फोन 2 फ्लॅगशिप-ग्रेड स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 SoC द्वारे समर्थित आहे. यात 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याच्या मागील पॅनलवर LED-आधारित ग्लिफ इंटरफेस देण्यात आला आहे.

Carl Pei Launches New Brand
Nothing Phone 2 Launch Date : Samsung-Xiaomi चे वाढले टेन्शन ! Nothing Phone 2 देणार का जबरदस्त टक्कर ? लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत

त्यामुळे स्वतंत्र बँडची गरज आहे

नथिंगच्या सीईओने स्पष्ट केले की गेल्या काही वर्षांमध्ये, नथिंगने सर्व उद्योग डिझाइन सीमा तोडून अधिक वापरकर्त्यांपर्यंत कसे पोहोचायचे आणि प्रभावित कसे करायचे हे दाखवले आहे. पेईने सांगितले की, व्हॅल्यू सेगमेंटमध्ये नवीन डिझाइन डिव्हाइसेस (Devices) सादर करण्यासाठी नवीन ब्रँड लॉन्च करण्यात आला आहे. कार्ल म्हणाले की मूल्य विभागामध्ये असे बरेच उत्पादने नाहीत जे हे करू शकतात.

Carl Pei ने CMF संदर्भात एक टीझर देखील जारी केला आहे जो वायरलेस इयरबडसाठी आहे. CMF चे पहिले इयरबड्स 2024 च्या सुरुवातीला लॉन्च (Launch) केले जाऊ शकतात. सध्या कंपनीने CMF डिव्हाइसेस भारतात विकली जातील की नाही याबाबत कोणतेही विधान जारी केलेले नाही. OnePlus, Oppo, Xiaomi आणि Poco सारख्या ब्रँडशी नथिंगचा सब-ब्रँड CMF स्पर्धा करणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.