if there is no fever, why is our body hot
if there is no fever, why is our body hotब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ताप आला नाही तरी आपले अंग गरम का असते ? तज्ज्ञांनी सांगितले त्याचे कारण

आपले अंग गरम का असते ? जाणून घ्या
Published on

मुंबई : पावसाळा सुरू झाली की, वातावरण बदलत जाते. पावसाळ्यात अनेक साथीचे रोग येत असतात. त्यामुळे, ताप व सर्दी, खोकल्या सारखे आजार होतात.

हे देखील पहा -

आपल्याला ताप आल्यानंतर आपण तो थरमामिटरने चेक करतो. तपासल्यानंतर ९९ डिग्रीपर्यंत तो दाखवत असेल तर नेमका आपल्याला ताप आहे की, नाही हे कळत नाही. शरीरातील तापमान वाढल्यामुळे आपल्याला चिंता वाटते. शरीरात वाढलेल्या तापमानाला आपण ताप आल्याचे समजतो. या परिस्थित आपण आपल्या काही घरगुती (Home) किंवा मेडिकल (Medical) किटमधून औषध घेतो. पण शरीरात वाढलेल्या तापमानाचे कारण काय हे जाणून घेऊया.

तज्ज्ञांचे मत असे आहे की, वेगवेगळ्या व्यक्तीच्या शरीरानुसार त्याचे तापमान हे वेगवेगळे असते. दिवसभरात शरीराचे तापमान हे बदलत जाते. यासाठी अंग गरं लागत असले की, त्याला ताप आल्याचे निदान लावू नये जोपर्यंत त्याची लक्षणे दिसत नाही. तज्ज्ञांचे मत असे आहे की, सकाळच्या वेळी शरीरातील तापमान हे सौम्य असते व दुपारनंतर ते वाढत जाते. आपल्याला ताप आल्याचे लक्षण जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत याला सामान्य समजावे.

if there is no fever, why is our body hot
ही लक्षणे सतत दिसत असतील तर, आपल्याला होऊ शकतो गंभीर आजार

वयोवृध्दांमध्ये याचे प्रमाण कमी असते व तरुण पिढीमध्ये याचे प्रमाण अधिक दिसू लागते. त्यातील काही लोकांच्या शरीरातील तापमान हे जास्त असून देखील त्याचे आरोग्य हे सुदृढ असते. तज्ज्ञांच्या मते व्यायाम, योग, गरोदर स्त्री व खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीराचे तापमान अधिक असते. जर आपले अंग गरम लागत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, अंगदुखी यांसारख्या समस्या जाणवत असतील त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com