Early Signs Of Dementia In Women : तुम्हालाही विसरण्याची सवय लागलीये ? गोष्टी आठवताना त्रास होतोय ? जडलाय 'हा' गंभीर आजार

बऱ्याचदा काही लोक डिमेंशिया या गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करतात.
Early Signs Of Dementia In Women
Early Signs Of Dementia In WomenSaam Tv
Published On

Early Signs Of Dementia In Women : मानवाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या असतात. अशातच सध्याच्या घडीला दिवसेंदिवस वाढत चाललेला डिमेंशिया हा आजर झपाट्यानं वाढत चालला आहे.

डिमेंशिया हा एक असा रोग आहे ज्यामध्ये मानवाचं डोकं चालनं बंद पडतं. त्यात माणसाच्या रोजच्या बोलण्यात फरक जाणवतो. अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत याचाही विसरं पडतो.

माणसाच्या अशा प्रकारच्या वागण्याला डिमेंशिया असं म्हटल जातं. बऱ्याचदा काही लोक डिमेंशिया या गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करतात.

Early Signs Of Dementia In Women
Health Tips for Pregnant Women : मद्यपान करणाऱ्या महिलांनो सावधान; गरोदरपणात मद्य पिण्याचे भयंकार परिणाम आले समोर

वय वाढत चाललं की माणसाला काही गोष्टींचा विसर पडतो असा त्यांचा समज असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? हा आजार वाढत्या वयामुळे नाही होत. हा आजार वयामुळे माणसाच्या डोक्यामध्ये फरक पडण्यापेक्षा अगदी वेगळा आहे.

संशोधनाच्या मते, डिमेंशिया हा रोग पुरुषांच्या तुलनेत महिलांना खूप लवकर होण्याची संभावना केली जाते. डिमेंशिया हा रोग समजण्यास थोडी अडचण येऊ शकते. कारण, प्रत्येक माणसामध्ये या रोगाची वेगवेगळी लक्षणे आढळून येतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला आहे की नाही हे समजणे कठीण होऊन बसते.

महिलांमध्ये मोनोपॉज आणि एस्ट्रोजन हॉर्मोन्सच्या कमतरमुळे डिमेंशिया या आजाराची तीव्रता वाढू शकते. महिलांनामध्ये सुरुवातीला अशी लक्षणे आढळून येतात.

1. विस्मरण वाढणे -

डिमेंशिया या रोगाचं पाहिलं लक्षण म्हणजे विस्मरण. दैनंदिन कामकाजातील अनेक प्रकारच्या गोष्टींचे विस्मरण होऊ शकते.

2. अपघात झालेला महिलांना होतो जास्त त्रास -

डिमेंशिया जास्त करून अशा महिलांना उद्भवतो ज्यांचा वाढत्या वयात अपघात झाला असेल. कुठेतरी धडपडून खाली पडणे अशा प्रकारची लक्षणे डिमेंशीया हा रोग झाल्याचं दर्शवते.

Early Signs Of Dementia In Women
Early Signs Of Dementia In Women Canva

3. बोलण्यामध्ये अडथळा येणे -

या आजारामध्ये महिलांना दुसऱ्या व्यक्तीला आपली एखादी गोष्ट समजावून सांगण्यास अडचण येते. वाढत्या वयामुळे बोलण्यात हळु - हळू फरक जाणवायला लागतो. बोलताना अचानक शब्द विसरून जाणे. अशा पद्धतीची लक्षणे डिमेंशियाची आढळून येतात.

4. डिमेंशियामध्ये महिलांना विचार करण्यास आणि स्वतःचे निर्णय घेण्यास कठीण होऊन बसते. त्याचबरोबर अंकगणीतीमध्ये अडचण येणे. पैसे मोजण्यात अडथळा जाणवणे. ही लक्षणे सुध्दा डिमेंशिया पीडितांच्यामध्ये आढळून येतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com