Canned Juice: डबाबंद ज्यूस पिताय, सावधान! डबाबंद ज्यूसमुळे तुम्ही पडू शकता आजारी?

Canned Juice Side Effect: तुम्हालाही डबाबंद ज्यूसचं पिण्याचं आवड आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Canned Juice: डबाबंद ज्यूस पिताय, सावधान! डबाबंद ज्यूसमुळे तुम्ही पडू शकता आजारी?
Canned Juice Side Effect
Published On

आता डबाबंद ज्यूस पिणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी...डबाबंद ज्यूस म्हणजे रियल फ्रूट असा जर तुमचा समज असेल, तर ही बातमी आवर्जून पाहा...डबाबंद ज्यूसच्या नावावर साखरपाक दिला जात असल्याचा दावा एका मेसेजमधून करण्यात आलाय. ICMRचा दाखला देत हा मेसेज व्हायरल होतोय. ज्यूसमुळे गंभीर आजार होऊ शकतात असा इशाराही देण्यात आलाय. व्हायरल मेसेजमागचं नेमकं सत्य काय आहे, चला पाहूयात..

सध्या जिकडे पाहावं तिकडे पॅकफूडची मागणी वाढतीय. सुपरमार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबाबंद ज्यूस पाहायला मिळतायेत. रियल फ्रूट जूस, एनर्जी ड्रिंक्स, हेल्थ ड्रिंक्स, शुगर फ्री अशा नावानं प्रत्येक कंपनी आपल्या उत्पादनांची जाहिरात करतीये..मात्र हे डबाबंद ज्यूस आरोग्यासाठी खरचं हेल्दी आहेत का? याबाबत इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMRच्या नावाने एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात रियल फ्रूट ज्यूसच्या नावानं लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्यासाचा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये काय म्हंटलय पाहूयात

ICMRच्या म्हणण्यानुसार बाजारात विकला जात असलेला रियल फ्रूट जूस म्हणजे फळांचा रस नाही. त्यात 10%ही फ्रूट पल्प नसतो. या ज्यूसमध्ये 90% कॉर्न सिरप, फ्रुक्टोज आणि साखरेचे इतर घटक असतात. बहुतांश रियल फ्रूट जूसध्ये साखरेचा घोळ आणि फळांची चव येण्यासाठी फ्लेव्हर मिक्स केले जातात. बरेच जण हेल्दी राहण्यासाठी असे डब्बाबंद ज्यूस घेतात. रुग्णांनाही आपण हेच ज्यूस देतो. त्यामुळे याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही गुगल सर्च करून पाहिलं तेव्हा ICMRच्या दाव्याबाबत कोणती माहिती समोर आली पाहा.

व्हायरल सत्य

साम इन्व्हेस्टिगेशन

कोणत्याही पॅक पदार्थातील नैसर्गिक गुणधर्म टिकवणं कठीण आहे. त्यासाठी रंग फ्लेवर किंवा इतर कृत्रिम घटक मिसळणं आवश्यक आहे. बाजारात विकले जाणारे डबाबंद ज्यूस हे याच प्रक्रियेनुसार बनवले जातात. मात्र नॅचरल असं लेबल लावून त्याची सर्रास विक्री केली जाते. ICMRच्या माहितीनुसार शुगर-फ्री नावावर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादनाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जातीय. खरं तर त्यात रिफाइंड फॅट, प्युरीफाइड आर्टिफिशियल न्यूट्रिएंट्स आणि साखर मिसळलेली असते

आम्ही या उत्पादनांबाबत आणखी खोलात जाऊन पडताळणी केली त्यावेळी तज्ज्ञांनी काय सांगितलं तेही पाहा. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.

व्हायरल सत्य

साम इन्व्हेस्टिगेशन

डबाबंद ज्यूसबाबत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. शुगर फ्री सांगून लोकांची फसवणूक केली जाते. डबाबंद ज्यूस नैसर्गिक नसून त्यात फळांचा पल्प असतो. बऱ्याच ज्यूसमध्ये साखर आणि फ्लेव्हर मिसळलेलं असतात.

फायनल व्हीओ- आमच्या पडताळणीत डबाबंद ज्यूस हेल्दी नाहीत हा दावा सत्य ठरलाय. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 100 टक्के नैसर्गिक, हार्ट हेल्दी, नो कोलेस्ट्रॉल असे शब्द वापरून जाहिरात केली जाते. तुम्ही अशा उत्पादनाना बळी पडू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com