Dr APJ Abdul Kalam : युवकांना प्रेरणा देणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम !

डॉ.कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.
Dr APJ Abdul Kalam
Dr APJ Abdul KalamSaam Tv

Dr APJ Abdul Kalam : 'मिसाईल मॅन' आणि माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. डॉ. कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी (डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस) झाला.

डॉ.कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक (Teacher), शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. ते भारताचे (India) 11 वे राष्ट्रपती होते. डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत.

Dr APJ Abdul Kalam
APJ Abdul Kalam Death Anniversary: 'मिसाइल मॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे १० प्रेरणादायी विचार

कलाम यांचे काही अनमोल विचार आज या निमित्ताने वाचूया.

  1. पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.

  2. जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमचे लक्ष्य ठेवा.

  3. जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात फेल झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.

  4. सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.

  5. यशस्वी होण्याचा आपला हेतू पुरेसा मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.

  6. हे शक्य आहे की, आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे.

  7. वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.

  8. जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की, आपल्या समाजात असे 3 लोक आहेत जे ते करू शकतात. हे वडील, आई आणि शिक्षक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com