Double Sunrise: २९ मार्च रोजी दिसणार सूर्यग्रहण, जाणून घ्या कुठे दिसेल हे 'दुहेरी सूर्योदय'

Solar Eclipse: २९ मार्च रोजी आंशिक सूर्यग्रहण होईल. या ग्रहणाच्या वेळी सूर्य दोन वेळा उगवतो असे दिसते, ज्यामुळे एक अद्भुत दृश्य निर्माण होते. हे ग्रहण नेमकं कुठे दिसणार आहे जाणून घ्या.
Double Sunrise
२९ मार्च रोजी दिसणार सूर्यग्रहण, जाणून घ्या कुठे दिसेल हे 'दुहेरी सूर्योदय'Saam Tv
Published On

एकाच दिवशी दोनदा सूर्य उगवू शकतो असा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर मग, २९ मार्च २०२५ रोजी जे सूर्य ग्रहण होणार आहे त्यावर लक्ष ठेवा. २०२५ वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण असेल.

या दिवशी एक वेगळेच दृश्य दिसेल, ज्याला 'डबल सनराईज' म्हणतात. ते जरी भारतात दिसणार नसले तरी अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड आणि आइसलँडच्या काही भीगातील लोक ते पाहू शकतात.

Double Sunrise
Sun Set: जगात असेही देश आहे जिथे सूर्यास्त होत नाही, कोणते तुम्हाला माहितीये का?

सूर्यग्रहण आणि 'दुहेरी सूर्योदय' म्हणजे काय?

ज्यावेळेस चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्याचा काही भाग व्यापतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात. यावेळी हे होणार आहे. सूर्योदय होण्याच्या वेळी ग्रहण झाले तर 'दुहेरी सूर्योदय' होतो. पहिले सूर्याचा एक भाग दिसतो, नंतर ग्रहणामुळे काही काळासाटी तो मंद होतो आणि ग्रहण निघून गेल्यानंतर असे वाटते की जणू काही सूर्य पुन्हा उगवत आहे. याच कारणास्तव त्याला 'दुहेरी सूर्योदय' म्हणतात.

हे सूर्यग्रहण कुठे दिसेल?

या अनोख्या खगोलीय घटनेचे आकर्षक दृश्य अमेरिका तसेच कॅनडाच्या पूर्वेतील भागात दिसून येईल. ज्यात "सोलर हॉर्न्स" नावाचा एक अत्यंत आकर्षक देखावा दिसेल. यामध्ये सूर्याच्या कडांवर तेजस्वी बिंदू किंवा 'हॉर्न्स' दिसून येतील.

  • फॉरेस्टविले, क्यूबेक: सूर्योदय - सकाळी ६:२० (EDT), ग्रहण ८७% - सकाळी ६:२४

  • सेंट अँड्र्यूज, न्यू ब्रंसविक: सूर्योदय - सकाळी ७:१५ (एडीटी), ग्रहण ८३% - सकाळी ७:१८

  • क्वॉडी हेड स्टेट पार्क, मेन: सूर्योदय - सकाळी ६:१३ (EDT), ग्रहण ८३% - सकाळी ६:१७

  • कॅम्पोबेलो बेट, न्यू ब्रंसविक: सूर्योदय - सकाळी ७:१४ (एडीटी), ग्रहण ८३% - सकाळी ७:१८

  • प्रेस्क आयल, मेन: सूर्योदय - सकाळी ६:१६ (EDT), ग्रहण ८५% - सकाळी ६:२१

जर तुम्ही या ठिकाणी असाल तर उंच ठिकाणावरून किंवा समुद्रकिनाऱ्यावरून ते पाहण्याची मजा आणखी वाढेल.

Double Sunrise
Sun Transit 2024: सूर्याच्या गोचरमुळे 'या' राशी जगणार राज्यासारखं आयुष्य; अचानक बनू शकणार गडगंज श्रीमंत

भारतात कधी होणार सूर्यग्रहण?

हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये, परंतु भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल, ४:१४ ला तयाचा शिखर गाठेल आणि संध्याकाळी ६:१३ वाजता संपेल.

सरल सूर्याकडे पाहणे तुमच्या डोळ्यांसाठी हाणीकारक ठरू शकते. जर ग्रहण पहायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. जसे की सोलर फिल्टर असलेले चष्मा वापरणे. चष्म्यातून ग्रहण पाहणे सुरक्षित नाही. हाताने धरून ठेवता येणारा सौर दर्शक किंवा प्रक्षेपण तंत्र वापरा. छिद्रित कागद किंवा दुर्बिणीचा वापर करून अप्रत्यक्षपणे पहा. मोबाईल किंवा कॅमेऱ्यातून थेट पाहू नका. सोलर फिल्टरशिवाय कॅमेरा किंवा मोबाईलमधून पाहिल्याने डोळ्यांना नुकसान होण्याची शक्यता असते.

यंदाच्या वर्षी दोन सूर्य ग्रहण असतील

जर तुम्हाला हे अद्भुत दृश्य पहायचे असेल, तर काळजी करू नका. काही आंतरराष्ट्रीय संस्था हे ग्रहण युट्यूब तसेच अन्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह दाखवतील. २९ मार्च नंतरचा दुसरा आंशिक सूर्य ग्रहण २१ सप्टेंबर २०२५ ला दिसेल. जर तुम्हाला खगोलशास्त्रात आवड असेल, तर हे अद्भुत दृश्य पाहण्याची ही एक खास संधी आहे. आणि जर तुम्ही ते पाहू शकत नसाल तर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घ्यायला विसरू नका.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com