Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Does Smoking Really Make Your Voice Deeper: सतत धूम्रपान केल्याने आवाज घोगरा होऊ शकतो आणि स्वरयंत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सिगारेटमधील रसायनांमुळे घशात सूज, खोकला आणि घशाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.
Health Care Tips
Smoking Side EffectsSAAM TV
Published On

सिगारेट पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. अशातच अनेकांचा असा विश्वास आहे की, सिगारेट ओढल्यामुळे तुमचा आवाज बदलू शकतो. पण खरंच असं होतं का? जर तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर याचं उत्तर होय, असं आहे.

डॉक्टरांचे म्हणणे काय आहे?

क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, कान, नाक आणि घशाच्या आजारांच्या तज्ज्ञ डॉ. कॅन्डेस ह्रेलाक यांनी सांगितले आहे की, धूम्रपानाचा आवाजाच्या गुणवत्तेवर, पट्ट्यावर परिणाम होऊ शकतो. खरं तर सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या धुरामध्ये शेकडो रसायने असतात.

Health Care Tips
Liver problem symptoms: रात्री सतत पाठदुखी होतेय; लिव्हर खराब होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

ज्यावेळी एखादी व्यक्ती सिगारेटचा धूर आत घेते, तेव्हा तो प्रथम घशातून थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. यामुळे या भागांमध्ये जळजळ आणि सूज येऊ शकते.

सतत धूम्रपानाचे परिणाम

सतत धूम्रपान केल्याने घसादुखी, कफ आणि खोकला वाढू शकतो. वारंवार खोकल्यामुळे स्वरयंत्र एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे त्यांची सूज आणखी वाढते. या सुजेमुळे आवाज हळूहळू घोगरा होऊ शकतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा त्रास गायकांमध्ये अधिक जाणवू शकतो. उच्च पट्टीतले सूर स्वरयंत्रावर अधिक दाब टाकतात. जर त्यांना आधीच सूज असेल, तर आवाजातील बदल स्पष्टपणे जाणवू शकतात.

Health Care Tips
How Painkillers Work: पेनकिलर घेतल्यानंतर लगेच कशा गायब होतात वेदना? वाचा औषधं पोटात गेल्यावर कसं काम करतं?

काही प्रकरणांमध्ये, आवाज घोगरा होतो किंवा कित्येक दिवस स्पष्ट बोलता येत नाही. इतकेच नाही, तर घशात मांस वाढण्यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्यामुळे श्वास घेणेही कठीण होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते.

Health Care Tips
Heart blockage treatment: हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलं अँजिओप्लास्टी करण्याची गरज कधी भासते

कॅन्सरचाही असतो धोका

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सतत धूम्रपान केल्याने घशाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये आवाजात बदल होणे याचा समावेश असू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा आवाज तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ घोगरा राहिला किंवा त्यात बदल झाला, तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com