
Hair Care Tips : केसांची काळजी सर्वच घेतात. शॅम्पू, हेअर ऑइल, कंडीशनरचा वापर करून आपण केसांची काळजी घेत असतो. बाहेरील प्रदूषण, धूळ, माती, ऊन यामुळे केस खराब होतात त्यामुळे काही काही लोक दररोज हेअर वॉश करतात परंतु केस आठवड्यातून किती वेळा वॉश करायचे हे सर्व तुमच्या केसांवर अवलंबून असते
तुम्हालाही रोज हेअर (Hair) वॉश करायची सवय असेल तर केस कमकुवत होऊन सहज तुटू शकतात. जर तुम्हाला केसांच्या होणाऱ्या समस्या दूर करायचा असेल तर हेअर वॉश करताना गरम पाण्याचा वापर शक्यतो टाळावा.
तसेच हेअर वॉश दररोज न करता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावा केस धुताना गरम पाण्याचा (Water) वापर न करता कोमट पाण्याचा वापर केला पाहिजे. जर गरम पाण्याचा वापर करत असाल तर त्यामुळे टाळू कोरडी पडते आणि केस कमजोर होतात.
कोमट पाण्याने केस धुवा -
केमिकल शॅम्पू चा वापर करून गरम पाण्याने केस सारखे धुतल्यास त्यांचा वाईट परिणाम होऊन केस कमजोर होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस गरम पाण्याने न धुता कोमट पाण्याने हलक्या हाताने धुतल्याने केस मजबूत राहतात.
जर तुम्ही स्ट्रॉंग शाम्पू वापरत असाल तर -
आपले केस सिबम नावाचे नैसर्गिक तेल तयार करतात चे आद्रता गमावण्यापासून संरक्षण करतात जर या स्ट्रॉंग शाम्पूचा उपयोग केला तर ते तेल सहसा टाळूतून निघून जाते आणि केसांना नुकसान होते.
तसेच केस जास्त धुतल्यामुळे केसांना खाज सुटण्याची शक्यता असते. कोंडा होणे,गुंतागुंत होणे, टाळू आणि केस कोरडे पडणे इत्यादी केसांच्या समस्या होतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.