Eyes Care Tips: दररोज वॉटरप्रूफ मस्करा वापरताय? तुमचे डोळे आणि पापण्या धोक्यात येऊ शकतात, जाणून घ्या कारणं

Waterproof Mascara: बहुतेक महिलांना मस्कारा लावायला आवडते, पण वॉटरप्रूफ मस्करा वापरण्याचे काही दुष्परिणाम असू शकतात. जाणून घ्या हे मस्करा नेमकं किती सुरक्षित आहे.
Eyes Care Tips
Eyes Care Tipsfreepik
Published On

महिलांना डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी विविध प्रकारची मेकअप उत्पादने वापरण्याची आवड असते. काजल, आयलाइनर, आयशॅडो आणि मस्कारा हे त्यातील प्रमुख घटक आहेत. विशेषतः मस्करा पापण्या लांब व घनदाट दाखवतो, त्यामुळे डोळे अधिक आकर्षक दिसतात. योग्य मस्करामुळे संपूर्ण लूकमध्ये कमालीचा बदल जाणवतो आणि डोळ्यांना अधिक उठाव येतो.

उन्हाळ्यात घामामुळे मेकअप खराब होऊ नये म्हणून अनेक महिला वॉटरप्रूफ मस्करा वापरणे पसंत करतात. हा मस्करा लूक तर उठावदार करतो, पण त्याचा डोळ्यांवर दुष्परिणामही होऊ शकतो. त्वचा तज्ज्ञांच्या मते, वॉटरप्रूफ मस्कराचा नियमित वापर डोळ्यांची संवेदनशीलता वाढवू शकतो. म्हणूनच, तो वापरताना काळजी घेणे आणि योग्य पद्धतीने काढणे आवश्यक आहे.

पापण्या कोरड्या करते

दररोज वॉटरप्रूफ मस्कराचा वापर केल्यास पापण्या कोरड्या होण्याची शक्यता वाढते. यामुळे त्या कमकुवत होतात आणि गळू लागतात. या मस्करातील रसायने पापण्यांचे नैसर्गिक तेल काढून टाकतात, जे हानिकारक ठरते.

मेकअप रिमूव्हर

वॉटरप्रूफ मस्कारा पापण्यांवर घट्ट बसतो आणि केवळ पाण्याने काढता येत नाही. यासाठी मेकअप रिमूव्हर लागतो, पण त्याचा अतिरेक केल्यास पापण्या कमकुवत होतात आणि त्यांच्या नैसर्गिक संरचनेवर परिणाम होऊ शकतो.

डोळ्यांमध्ये जळजळ

वॉटरप्रूफ मस्करामधील काही घटक डोळ्यांना कोरडेपणा देतात, त्यामुळे जळजळ होऊ शकते. संवेदनशील डोळ्यांमध्ये अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे त्रास झाल्यास त्वरीत नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

छिद्रे बंद होतील

वॉटरप्रूफ मस्कारा काढताना घाई केल्यास त्याचे कण डोळ्यांत राहू शकतात, जे त्वचेत अडकून छिद्रं बंद करतात. यामुळे मुरुम, जळजळ आणि इतर त्वचासंबंधित त्रास निर्माण होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com