पुणे: जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ते कदाचित तुमच्या कमकुवत रोग प्रतिकारशक्तीमुळे असू शकते. अस्वच्छ, असंतुलित आहार, नियमित व्यायाम न करणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष न देणे, या काही गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्हाला रोग आणि त्याचे संक्रमण अधिक लवकर होऊ शकते. यामुळे वैयक्तिक स्वच्छता आणि तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करा;
जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर हवामान बदलामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ संत्रा, हळद आणि तुळशीची पाने यासारख्या गोष्टी खा. रोज दूध हळद आणि तुळस टाकून प्या. हिरव्या भाज्या, फळे आणि सुका मेवा खा.
वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या;
रोग आणि संक्रमण टाळण्यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केल्यास आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे फक्त स्वच्छ शौचालये वापरा. याशिवाय रोज आंघोळ करणे, कपडे स्वच्छ ठेवणे आदी गोष्टींची काळजी चांगली घ्या.
खाण्याचा योग्य मार्ग;
तुम्ही फास्ट फूड खाणाऱ्या सायवीचे बळी असाल तरीही तुम्ही लवकर आजारी पडू शकता. रात्री ८ वाजल्याच्यानंतर अन्न खाऊ नका. सकाळी उठल्यानंतर 40 मिनिटांच्या आत नाश्ता करा. एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी दिवसातून 5 वेळा थोडे जेवण घ्या. तसेच नियमित व्यायाम देखील करा.
जीवनसत्त्वे घ्या;
आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे घ्या. भरपूर भाज्या आणि फळे खा. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन डी 3 चे सेवन करा. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने सप्लिमेंट्स घेता येतात. मात्र, नैसर्गिक अन्नातून आवश्यक जीवनसत्त्वे घेणे हे उत्तमच. दारू आणि धूम्रपान करणे टाळा.
शरीराची वेळोवेळी आवश्यक तपासणी करा;
वेळोवेळी चेकअप आणि शरीरसंबंधी आवश्यक चाचण्या करत राहा. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर पुरुषांनी मधुमेहाची तपासणी नक्की करून घ्यावी. याशिवाय प्रोस्टेट कॅन्सर टाळण्यासाठी नियमित चाचण्याही आवश्यक आहेत. तुम्हाला हृदयाशी (Heart Problems) संबंधित कोणतीही समस्या नाही ना हे एकदा हृदयरोगतज्ज्ञांना दाखवून निश्चित करून घ्या. तसेच वर्षातून दोनदा दंतवैद्याला (Dentist) भेट द्या. डोळ्यांची (Eye Care) तपासणीही करत रहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.