Hair Care: हात फिरवताच हातात केसांचा झुपका येतो? तेलात मिसळा १ पदार्थ, दाट केसांचं सिक्रेट

Hair Fall Remedy : पावसात आणि वर्षभर केस गळतीची समस्या वाढते. कांद्याचा रस, एरंडेल तेल, मेथी, शेवग्याची भाजी आणि सब्जा यांसारख्या घरगुती उपायांनी केस मजबूत, चमकदार आणि निरोगी होतात.
Hair Care
Hair Care Tipsfreepik
Published On

महिलांचे किंवा पुरुषांचे सौंदर्य फक्त त्यांच्या त्वचेवर नाहीतर केसांमध्ये सुद्धा असतं. वर्षाच्या बारा महिने प्रत्येकाला केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत असते. थोडे फार केस गळणे ही समस्या खूप सामान्य मानली जाते. मात्र त्यांचे प्रमाण वाढत असेल तर ती एक गंभीर समस्या आहे. पुढे आपण केस गळती थांबवण्यासाठी, केस मुळापासून मजबूत आणि चमकदार होण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक पद्धतीने काय केलं पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

केसांच्या समस्या वाढायला लागल्या की, विशेषत: महिला हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करायला लागतात. त्यामध्ये क्रीम, शॅम्पू, तेल किंवा सीरमचा वापर केला जातो. मात्र हे प्रोडक्ट विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण बाजारात उपलब्ध असलेले हेअर केअरचे प्रोडक्ट केमिकल्सचा वापर करुन तयार केलेले असतात. त्यामुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच खराब व्हायला लागतात. त्यामुळे केस गळतात, त्यांची वाढ थांबते आणि त्यांची चमकही निघून जाते.

Hair Care
Sleep Care: रोज अपूरी झोप? मेंदूवर होईल गंभीर परिणाम, वेळीच 'हे' परिणाम ओळखा

मुख्त: पावसाच्या दिवसांत महिलांचे केस जास्त गळतात. केसांमध्ये कोंडा आणि टाळूला इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. याचं कारण म्हणजे पावसाचे पाणी केसांमध्ये गेल्यानंतर केस ओले राहतात आणि कोंडा वाढतो. त्यानेच केसांच्या समस्या वाढतात. यावर उपाय काय जाणून घ्या.

तेलकट केस

जर तुमचे केस तेलकट होण्याच्या समस्या वाढत असतील तर, तुम्ही सौम्य, सल्फेट फ्री शॅम्पू वापरा.

सब्जाचे सेवन करा

केसांची वाढ होण्यासाठी पाण्यात सब्जा टाकून पित राहा. त्याने केस झपाट्याने वाढायला लागतात.

शेवग्याची भाजी

शेवग्याच्या भाजीचे सेवन केल्याने ब्लड सर्क्युसेशन वाढते आणि केस तुटण्याच्या समस्या कमी होतात.

एरंडेल तेल

केसांना तेल लावा. केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी तेल खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये तुम्ही अळशीचा वापर करा. त्याने केसांच्या अनेक समस्या काहीच दिवसात दूर होतील.

कांद्याचा रस

केस गळतीवर कांद्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो. मेथीचे दाणे केसांसाठी सुद्धा फायदेशीर मानले जातात. त्याने केसांमधील कोंडा कमी होतो आणि नैसर्गिक चमक वाढायला सुरुवात होते.

Hair Care
Weight Loss Tips: पोटाच्या टायर्सनं हैराण झालात? घरचं जेवण करा अन् वजन घटवा; तज्ज्ञ सांगतात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com