How To Fall Asleep In 5 Minute : तुम्हालाही रात्रीची झोप येत नाही ? निद्रानाशाच्या त्रासाने वैतागले आहात ? 'हा' चहा पिऊन तर बघा

रात्री तुमची झोप चांगली झाल्यावर तुमचा दिवस चांगला जातो त्याच बरोबर तुमचा मूड देखील फ्रेश असतो.
How To Fall Asleep In 5 Minute
How To Fall Asleep In 5 MinuteSaam Tv
Published On

How To Fall Asleep In 5 Minute : पर्याप्त प्रमाणात चांगली झोप आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. रात्री तुमची झोप चांगली झाल्यावर तुमचा दिवस चांगला जातो त्याच बरोबर तुमचा मूड देखील फ्रेश असतो.

तुमची बॉडी आणि तुमचा ब्रेन चांगल्या प्रकारे काम करतो. दिवसभरातील कामामुळे आपण रात्री लवकर झोपून जातो. परंतु, काही लोकांना रात्र रात्रभर झोपच येत नाही. अशा लोकांसाठी आम्ही एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय वापरून ज्या लोकांना रात्रीची झोप येत नाही आणि दुसरा दिवस खराब जातो त्यांच्यासाठी आहे.

How To Fall Asleep In 5 Minute
Difficult To Sleep : रात्री झोपणे खूप अवघड होत आहे का? 'या' योगप्रकाराणे होईल झोप पूर्ण

रात्रभर झोप आली नाही की, आपला दुसरा दिवस अगदी चिडचिड आणि बोरिंग वाटू लागतो. कारण म्हणजे रात्रीची चांगली झोप न झाल्याने आपला मूड फ्रेश नसतो. रोजच्या कामांमध्ये आपण उत्साहित नसतो. यासाठीच आम्ही तुम्हाला एकच चहा सांगणार आहे. याचे सेवन केल्याने तुम्हाला रात्रीची साखर झोप लागू शकते. त्याचबरोबर या चहाचे अनेक फायदे देखील आहेत. तो चहा म्हणजे केमोमाईल. केमोमाईल हा चहा केमोमाईलच्या फुलांपासून बनवला जातो.

एमबीसीआईच्या रिपोर्टनुसार या फुलांमध्ये अँटी इम्प्लिमेंटरी, अँटिऑक्सिडेंट , हीलिंग यासारखे पोषक तत्व असतात. जे आपल्या आरोग्यासाठी (Health) अतिशय फायदेशीर असतात.

झोप येण्यासाठी केमोमाईलच्या चहाचे सेवन करा : अभ्यासानुसार केमोमाईलच्या चहामध्ये अपीजेनीन नावाचे फ्लेवोनोईड असते. जे चांगली झोप येण्यासाठी काम करते. सोबतच केमोमाईलच्या चहाच्या सेवनाने डोकं शांत राहतं.

How To Fall Asleep In 5 Minute
Over Sleeping Problem : रात्रीची झोप घेतल्यानंतरही तुम्हाला दिवसा झोप का येते ? असू शकते गंभीर समस्या

झोपण्याआधी प्या केमोमाईल चहा : तुम्हाला रात्रीची झोप येत नसेल किंवा झोप येणे मध्ये प्रॉब्लेम होत असेल तर. तुम्ही झोपायच्या 30 ते 45 मिनिटे आधी केमोमाइलचा चहा प्या. तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी हा चहा तुमची मदत करेल.

Chamomile tea
Chamomile teacanva

केमोमोईलच्या चहाचे फायदे (Benefits) :

1. पोटाच्या विकारांपासून आराम देते.

2. हाडांना मजबूत करते.

3. मधुमेह नियंत्रित ठेवते.

4. कॅन्सर पासून आपला बचाव करते.

5. कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल ठेवते.

चांगल्या झोपेसाठी तुमच्या लाईफ स्टाईलमध्ये (Lifestyle) अशाप्रकारे करा बद्दल : रात्रीची अनियमित झोप ही तुमच्या पूर्ण दिवसाची वाट लावू शकते. तुम्हाला रोज वेळेवर झोपायला हवं असेल तर तुम्ही चार वाजल्यानंतर कॉफीचे सेवन करू नये. त्याचबरोबर झोपायच्या आधी दारू पिऊ नये, रात्री हेवी डिनर आणि मसालेदार जेवण खाण्यापासून वाचा. त्याचबरोबर झोपायच्या आधी मोबाईल आणि टीव्हीचा वापर करू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com