
आजकाल सर्वांना स्लीम ट्रीम राहायची इच्छा आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध पर्याय अवलंबतात. जर तुम्हालाही फीट आणि फाईन राहायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत. हा एक वॉकिंगचा प्रकार आहे.
कितीही बिझी शेड्यूल असेल तरी चालणं हा एक मार्ग आहे जो तुम्हाला फीट ठेवू शकतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत आणि लोक त्यांच्या सोयीनुसार पायी चालतात. दरम्यान, आजकाल एका खास प्रकारच्या चालण्याचा ट्रेंड सुरु आहे. हा ट्रेंड म्हणजे फार्ट वॉक. फार्ट वॉकची आजकाल सगळीकडे चर्चा होतेय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.
७० वर्षीय कॅनेडियन मर्लिन स्मिथ या गट हेल्थबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी फार्ट वॉक सुरू केला. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितलं की, त्या आणि त्यांचा नवरा दररोज जेवणानंतर चालायला सुरुवात करतात. जेणेकरून त्यांना गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल. चालताना आपण गॅस सोडतो, म्हणून त्याला फार्ट वॉक असं नाव दिलंय.
तुम्हाला या नावाने थोडंसं हसू येईल मात्र तुमच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. या फार्ट वॉकचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. मर्लिनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील इंटरनल मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. टिम ट्युटन यांनी या वॉकचं समर्थन केलं आहे. चालण्याची ही पद्धत आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे हे स्पष्ट केलं.
डॉ. टिम ट्युटन म्हणाले की, जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने किंवा चालल्याने आतड्यांची हालचाल वाढते. हे गॅस सोडण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतं. याशिवाय, याचा आणखी एक फायदा म्हणजे ते केवळ रक्तातील साखरेची वाढ रोखत नाही तर कॅन्सरचा धोका देखील कमी करते.
पायी चालल्याने गॅस बाहेर पडण्यास मदत होते.
दररोज हे चालणं नियमित आतड्यांच्या हालचालींना चालना देतं.
पायी चालल्याने आपले शरीर इन्सुलिनला संवेदनशील बनते.
चयापचय सुधारून वजन कमी करण्यास मदत करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.