Wrong UPI Payment
Wrong UPI Payment Saam Tv

Wrong UPI Payment : चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका, ही सोपी ट्रिक्स करेल तुमची मदत

UPI Payment : जगात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Published on

Wrong UPI : जगात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तंत्रज्ञान जे आपला वेळ वाचवते, कधी कधी घाईने आपल्याला तोट्याकडे खेचते. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने भारतीय डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये परिवर्तन केले आहे.

अनेक वेळा असे अहवाल येतात की वापरकर्त्याने चुकीच्या वापरकर्ता आयडीवर पैसे (Money) ट्रान्सफर केले आहेत. जेव्हा हे घडते तेव्हा लोक तणावग्रस्त आणि अस्वस्थ होतात. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पैसे सहज परत मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत या युक्त्या...

Wrong UPI Payment
UPI आणि UPI Lite मध्ये काय आहे फरक? पैशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणता आहे बेस्ट?

UPI अॅप सपोर्टवर इन्स्टंट मेसेज पाठवा -

तुम्ही घाईघाईत चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर (Transfer) केले असल्यास, सर्वप्रथम तुम्हाला GPay, PhonePe, Paytm किंवा UPI अॅपच्या कस्टमर केअर सपोर्टला कॉल करून माहिती द्यावी लागेल. तुम्ही कोणत्या चुकीच्या UPI आयडीने चुकून किती पैसे ट्रान्सफर केले हे तुम्हाला सांगावे लागेल.

NPCI (National Payments Corporation of India) पोर्टलवर तक्रार कशी करावी -

UPI अॅपच्या कस्टमर केअर सपोर्टकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यास तुम्ही NPCI पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकता.

याप्रमाणे तुमची तक्रार नोंदवा -

  • सर्व प्रथम NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर (Website) जा.

  • येथे तुम्हाला What we do टॅब नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या पेजवरील UPI वर क्लिक करा.

  • नंतर विवाद निवारण यंत्रणा निवडा.

  • तक्रार विभागांतर्गत व्यवहाराचे तपशील भरा,

  • शेवटी चुकीच्या पद्धतीने दुसर्‍या खात्यात हस्तांतरित केलेले निवडा आणि तक्रार सबमिट करा.

Wrong UPI Payment
UPI Payment Without PIN: आता PIN शिवाय होणार PhonePe वर व्यवहार ! UPI Lite अँप लगेच डाऊनलोड करा

बँकेशी संपर्क साधा -

येथे तक्रार करूनही तुमची समस्या दूर झाली नसेल, तर अशा स्थितीत तुम्ही ताबडतोब बँकेत जावे. तुम्हाला तिथे जाऊन तक्रार करावी लागेल किंवा शक्य असल्यास शाखा व्यवस्थापकाला भेटावे लागेल. तिथे जाऊन लेखी तक्रार द्यावी लागेल. तुम्ही ही तक्रार PSP/TPAP अॅपवर नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही बँकेत जाऊनही याबाबत तक्रार करू शकता.

RBI कडे तक्रार कशी करावी?

तुम्ही तुमची तक्रार RBI कडे तीन वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तुम्ही तुमची तक्रार RBI कडे लेखी नोंदवू शकता. यासह, तुम्ही तुमची तक्रार RBI कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टम (CMS) वर नोंदवू शकता किंवा तुम्ही संबंधित कार्यालयात कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com