हृदयविकाराच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; त्रास जाणवल्यास त्वरित करा 'हे' 3 काम

केके या नावाने प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे असे सध्या तरी सांगण्यात येत आहे. कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मोठ्या चिंतेचे कारण असतात.
Heart Attack symptoms in Marathi, causes of heart attack
Heart Attack symptoms in Marathi, causes of heart attackSaam Tv
Published On

Heart Attack: केके या नावाने प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे असे सध्या तरी सांगण्यात येत आहे. केके यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 31 मे रोजी रात्री केके यांना लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मोठ्या चिंतेचे कारण असतात. (heart attack symptoms in Marathi)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्यामागे तणाव, खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे हे प्रमुख कारण असू शकते. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो किंवा तो थांबतो. याला वैद्यकीय भाषेत मायोकेरियल इम्पेक्शन (myocherial impaction) म्हणतात.

अशी काही चिन्हे आहेत, जी दर्शवतात की तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जाणून घेऊयात अशी काही लक्षणे जी हृदयविकाराच्या झटक्याबाबत सांगू शकतील.

Heart Attack symptoms in Marathi, causes of heart attack
WhatsApp वर मेसेज पाठवल्यानंतरही करता येणार एडिट! येतंय नवीन फिचर...

हृदयविकाराच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका;

अस्वस्थता;

म्हंटले जात आहे की, केकेने लाइव्ह शो दरम्यान जाणवलेल्या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष केले. रिपोर्ट्सनुसार, हॉटेलच्या खोलीत पोहोचल्यानंतर त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागले. हृदयविकाराचा झटका येण्याचे हे एक सामान्य लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

छातीत दुखणे;

अनेकदा लोक छातीत दुखण्याच्या समस्येकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमचे वय 40 पेक्षा जास्त असेल आणि अचानक छातीत दुखत असेल तर उशीर न करता त्वरित डॉक्टरांकडे जा.

श्वासोच्छवासाची समस्या;

श्वास घेण्यास त्रास होणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण आहे. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अचानक चक्कर येऊ लागली असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. श्वास घेण्यात अडचण येणे हे हृदयविकाराचे सामान्य लक्षण आहे. तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही बेहोश होऊ शकता. याशिवाय घाम येणे, मळमळणे ही देखील हृदयविकाराची लक्षणे आहेत. लोक सामान्य समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु अशी वृत्ती घातक ठरू शकते.

या ३ गोष्टी लगेच करा;

ऍस्पिरिन घ्या:

जर तुम्हाला किंवा तुमच्या आसपासच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल, तर या स्थितीत पहिली गोष्ट म्हणजे वैद्यकीय मदत घेणे. जर वेळ लागत असेल तर एस्पिरिनची गोळी घ्या. ही गोळी अगोदर घरी आणून ठेवू शकता. ही गोळी रक्त पातळ करण्याचे काम करते असे सांगितले जाते.

सीपीआर द्या:

हार्ट अटॅक आल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध झाला असेल, तर या स्थितीत तुम्ही सावधगिरीने वागले पाहिजे. या स्थितीत तुम्ही रुग्णाला सीपीआर द्यावा. यामध्ये रुग्णाच्या छातीवर हात ठेवून दाब द्या. असे केल्याने रुग्णाला पुन्हा नीट श्वास घेता येतो.

रुग्णाशी बोलत राहा:

जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत बेशुद्ध होऊ देऊ नका. तज्ञांच्या मते, या वेळी तुम्ही रुग्णाशी वैद्यकीय मदत मिळेपर्यंत बोलत राहावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com