Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Balipratipada: वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंतचा सणांचा उत्सव म्हणजे दिवाळी. त्यातील पाडवा हा नवरा-बायकोसाठी विशेष मानला जातो. या शुभदिनी आपल्या जोडीदाराला प्रेमभरल्या शुभेच्छा पाठवा आणि नातं आणखी दृढ करा.
Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा
Published On

दिवाळी पाडवा हा नव्या वर्षाच्या स्वागताचा मंगलदायी दिवस मानला जातो. अंगणात रांगोळी, दारात तोरण आणि घरात आनंदाचे वातावरण यामुळे सण अधिक सुंदर बनतो. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळणी करतात, तर पुरुष पत्नीला भेट देतात. हे प्रेमाचे प्रतीक आहे. पाडवा म्हणजे नव्या आशा, संकल्प आणि नात्यांचा सण. ‘गोवर्धन पूजा’ आणि ‘बलिप्रतिपदा’ म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. जर तुम्हालाही आपल्या प्रियजनांना आणि जवळच्या व्यक्तींना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास संदेश, जे त्यांचा सण अधिक आनंदी आणि संस्मरणीय बनवतील.

कृष्ण-रुक्मिणीच्या जोड्याप्रमाणेच

आपला आपुलकीचा धागा दृढ राहो

दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सगळा आनंद

सगळे सौख्य

सगळ्या स्वप्नांची पूर्तता

सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे

दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

पाडव्याचा हा शुभ प्रसंग

घेऊन येवो आनंदाचे रंग

नात्यात गोडवा, मनात समाधान

जगात वाढो तुमचा सन्मान

दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन सुरुवात, नवीन उमेद

घरामध्ये येवो सुख-समृद्धी

पाडव्याच्या दिवशी नवचैतन्य लाभो

तुमचे आयुष्य सदैव फुलांप्रमाणे बहरो

दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज बलिप्रतिपदा

दिवाळीचा पाडवा

राहो सदा नात्यात गोडवा

दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com