Panvel Forts : दिवाळीत विकेंडला मुलांसोबत करा किल्ल्यांची सफर; पनवेलजवळ आहेत ५ सुंदर ठिकाणं, ट्रेकिंगही होईल सोपे

Family Trekking - Panvel Forts : दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबासोबत पनवेलला फिरण्याचा प्लान करत असाल तर किल्ल्यांची सफर आवर्जून करा. निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक वास्तू आणि ट्रेकिंगचा अनुभव एकाच ठिकाणी घ्या.
Family Trekking - Panvel Forts
Panvel FortsSAAM TV
Published On: 
Summary

लहान मुलांसोबत दिवाळीत इतिहासाची सफर करा.

पनवेल जवळ सुंदर, सुरक्षित ऐतिहासिक किल्ले वसलेले आहे.

लहान मुलांना जवळून इतिहास अनुभवता येईल.

लहान मुलांना दिवाळीची सुट्टी पडली आहे. मुलांना घरात बसून कंटाळा आला असले तर त्यांच्यासोबत किल्ल्यांची सफर करा. मुंबई-पुण्याच्या जवळ असलेले पनवेल हे केवळ औद्योगिक आणि वेगाने विकसित होणारे शहर नाही, तर इतिहासप्रेमी आणि दुर्गभटक्यांसाठीही खास ठिकाण आहे. पनवेलच्या आसपास अनेक ऐतिहासिक किल्ले असून, येथे ट्रेकिंगसोबतच सह्याद्रीचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवता येते.

कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला हा नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय आहे. पनवेलपासून साधारण १२–१५ किमी अंतरावर असलेला हा किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्यात आहे. जंगलातून जाणारी पायवाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि माथ्यावरून दिसणारा परिसर यामुळे हा अर्ध्या दिवसाच्या सहलीसाठी चांगला पर्याय आहे. ट्रेक सोपा ते मध्यम स्वरूपाचा आहे.

सांकशी किल्ला

सांकशी किल्ला हा शांत आणि कमी गर्दीचा आहे. पेण तालुक्यातील या किल्ल्यावर तुलनेने छोटी चढाई करता येते. किल्ल्यावर पाण्याची टाकी, गुहा आणि ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात. मात्र काही ठिकाणी दोरीचा आधार घ्यावा लागू शकतो; लहान मुलांसोबत काळजी घ्या.

सोंडाई किल्ला

कर्जतजवळील सोंडाई किल्ला तुलनेने कमी वेळेत करता येणाऱ्या ट्रेकसाठी ओळखला जातो. काही ठिकाणी चढण तीव्र आणि शिडीचा भाग असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी आवश्यक आहे.

बेलापूर किल्ला

बेलापूर किल्ला नवी मुंबईत असल्याने पनवेलहून जवळचा पर्याय ठरू शकतो. मोठा डोंगर चढण्याऐवजी किल्ल्याच्या परिसरात फेरफटका मारता येतो. कमी ट्रेकिंग हवे असलेल्या कुटुंबांसाठी हा पर्याय विचारात घेता येईल.

द्रोणागिरी किल्ला

उरण परिसरातील द्रोणागिरी किल्ला समुद्रकिनारा, खाडी आणि बंदराचे दृश्य अनुभवण्यासाठी ओळखला जातो. हा ट्रेक अतिशय सोपा आणि सुरक्षित आहे. सुट्टीत तुम्ही नक्की फिरायला जा.

Family Trekking - Panvel Forts
Watery Eyes : डोळ्यांतून सतत पाणी येतंय? सावधान! दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो 'या' गंभीर आजाराचा संकेत

किल्ल्यावर जाताना कोणती काळजी घ्यावी?

किल्ल्यावर जाताना आरामदायी कपडे आणि चांगल्या ग्रिपचे ट्रेकिंग शूज वापरा. पुरेसे पाणी, हलके खाद्यपदार्थ आणि प्राथमिक उपचारांचे साहित्य सोबत ठेवा. शक्यतो सकाळी लवकर ट्रेक सुरू करा आणि अंधार होण्यापूर्वी परत या. लहान मुलांसोबत जास्त अवघड किल्ल्यांची चढाई करू नका. किल्ल्यांवर जाताना अनुभवी माणूस कायम सोबत ठेवा. ज्याला किल्ल्याची आणि तेथील रस्त्याची संपूर्ण माहिती असेल.

टीप : वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.