Diwali 2023: बजेटमध्ये साजरी करा दिवाळी, या सोप्या ट्रिक्स वापरून अनावश्यक खर्च टाळा

Diwali 2023 : दिवाळीसाठी योग्य बजेट तयार करणे महत्त्वाचे आहे.
Diwali Financial Planning
Diwali Financial PlanningDiwali Financial Planning Tips - Saam Tv
Published On

Diwali Financial Planning Tips :

काही दिवसातच दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सोने-चांदीचे दागिने घेतले जातात. त्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा परिस्थितीत फायनानशियल प्लॅनिंग करणे खूप महत्त्वाचे आहे.

सणासुदीच्या काळात आपण खूप जास्त प्रमाणात शॉपिंग करतो. नवीन वस्तू घेतो. त्यामुळे कधीकधी खर्चाचे बजेट कोलमडते. खर्चाचे योग्य बजेट तयार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. या टीप्सचा वापर करुन तुम्ही पैशांची बचत करु शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Diwali Financial Planning
Diwali 2023 :दिवाळीत घराची-ऑफिसची साफसफाई करायची आहे? हे इलेक्ट्रिक गॅजेट्स करतील मदत

क्रेडिट कार्डचा वापर जपून करा.

अनेकदा आपणे क्रेडिट कार्डने शॉपिंग करतो. क्रेडिट कार्ड म्हणजे आता पैसे न देता खरेदी करा. एका ठरावीक काळानंतर हे पैसे द्यावे लागते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर जपून करा. कार्ड वापरताना आनावश्यक गोष्टींचा खर्च टाळा. योग्य नियोजन केल्यास तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत होईल.

नियम व अटी वाचा

जर तुम्ही क्रेडिट कार्डवरुन खरेदी करत असाल तर त्याचे व्याजदर तपासून घ्या. व्याजदर जास्त असल्यास तुम्ही अनावश्यक खर्च टाळा. तसेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पेमेंट मोडचा वापर केल्यास खर्च कमी होईल. उदाहरणार्थ, तुम्ही ऑनलाईन पेमेंटचा वापर केल्यास तुम्हाला अनेक रिवॉर्ड्स मिळू शकतात. तसेच वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन खरेदी केल्यास अनेक ऑफर्स मिळू शकतात.

Diwali Financial Planning
Low Blood Pressure : अचानक शरीरातील ब्लड शुगर कमी झालं? लो बीपीचा त्रास नाही ना, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष नकोच!

खरेदी करताना योग्य प्लॅनिंग करा

कधीही खरेदी करताना योग्य प्लॅनिंग करा. तुम्हाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्याची एक लिस्ट बनवा. त्या लिस्टनुसार शॉपिंग केल्यास तुमचा अनावश्यक खर्च टाळता येईल. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल.

Diwali Financial Planning
Diwali 2023 :दिवाळीला सेलिब्रेशन महागणार! भाऊरायाच्या खिशाला बसणार अधिकचा फटका, कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com