Health Tips : जेवणानंतर लस्सी पिणे म्हणजे आजारांना आमंत्रण; वाचा लस्सी पिण्याचे दुष्परिणाम

Lassi Disadvantages : सध्या उन्हाळा सुरू असल्याने अनेक व्यक्ती अशा पद्धतीने आहार घेतात. तुम्ही देखील जेवणानंतर लासी पित असाल तर आधी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊ.
Lassi Disadvantages
Health Tips Saam TV

रोजचं जेवण केल्यानंतर अनेक व्यक्तींना गोड खाण्याची सवय असते. प्रत्येक व्यक्तीच्या आणि त्यांच्या जिभेच्या विविध आणि वेगवेगळ्या चवी असतात. काही व्यक्ती सोडा तर काही व्यक्ती जेवण पचण्यासाठी विविध चूर्ण पावडरचं पाणी पितात. तर काही जण लस्सी देखील पितात. सध्या उन्हाळा सुरू असल्याने अनेक व्यक्ती अशा पद्धतीने आहार घेतात. तुम्ही देखील जेवणानंतर लासी पित असाल तर आधी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊ.

Lassi Disadvantages
Hydrate Foods : उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणारच नाही! डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

वजन वाढते

लस्सी बनवताना फुल फॅट मिल्कचा वापर केला जातो. यामध्ये जास्तप्रमाणात फायबर असते. यासह लस्सीमध्ये मसाले आणि साखर देखील असते. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरी आणखी वाढतात. त्यामुळे वजनही झपाट्याने वाढते. तुम्ही वजन कमी करत असाल तर आजपासून आहारातून लस्सी वर्ज करा.

रक्तातील साखर वाढते

जेवणानंतर अनेक व्यक्तींना रक्तातील साखर वाढण्याच्या समस्या असतात. त्यात जर तुम्ही लस्सी प्यायली तर साखर जास्त प्रमाणात वाढते. डॉक्टर देखील डायबिटीज असलेल्या रुग्णांना लस्सी न पिण्याचा सल्ला देतात.

सर्दी खोकला ताप वाढतो

उन्हाळ्यात बाहेरचे वातावरण गरम असल्याने आपण जास्तीत जास्त थंड पेय पितो. असे पेय प्यायल्याने आपल्या शरीरातील म्युकसचे प्रमाण वाढते. परिणामी सर्दीनंतर कफ आणि खोकला देखील वाढतो. त्यामुळे जेवणानंतर लस्सी पिणे बंद करा.

त्वचेच्या समस्या

लस्सी पिल्यावर नॉनव्हेज खाऊ नये. त्याने आपल्याला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. जर तुम्ही नॉनव्हेज पदार्थ जेवणात खाल्ले असतील तर त्यावर लस्सी पिऊ नका. त्याने त्वचेवर लाल चट्टे किंवा पांढरे चट्टे उमटण्याची शक्यता असते.

Lassi Disadvantages
Chocolate Lassi Recipe : कडाक्याच्या उन्हाळ्यात ट्राय करा चॉकलेट लस्सी,पाहा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com