UPI Payment : UPI ने केली क्रांती की, खिसा रिकामा?

Digital Payments : पैसे खर्च करण्यासाठी UPI पेमेंटचा ऑप्शन आहे. तुम्ही सुद्धा UPI मार्फत खर्च करत असाल. सध्या UPI ची क्रेझ फार वाढली आहे.
Digital Payments
UPI Payment Saam TV
Published On

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात अँड्रॉइड फोन आहेत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अँड्रॉइड फोन वापरतात. यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे पैसे खर्च करण्यासाठी UPI पेमेंटचा ऑप्शन आहे. तुम्ही सुद्धा UPI मार्फत खर्च करत असाल. सध्या UPI ची क्रेझ फार वाढली आहे.

Digital Payments
RBI UPI Tax Limit: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! RBI ने UPI द्वारे टॅक्स पेमेंट करण्याची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली

UPI केव्हा सुरू झालं?

साल 2016 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत UPI सुरू करण्यात आलं. UPI ची आता नागरिकांना इतकी जास्त सवय झाली आहे की प्रत्येक व्यक्ती याचा वापर करत आहेत. UPI जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट पद्धत म्हणून वापरलं जातं. एप्रिल-जुलै 2024 मध्ये UPI ने 80.8 लाख कोटी रुपयांचा ($964 अब्ज) व्यवहार केला आहे.

साल 2023 ची आकडेवारी

2023 मध्ये UPI ने 117.6 अब्ज इतके व्यवहार केले आहेत. यामध्ये आश्चर्यकारक बाब म्हणजे प्रति सेकंदाला UPI वर 3729.1 व्यवहार झाले आहेत. यावर्षी जुलै 2024 मध्ये UPI वर एकूण 20.64 लाख कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला आहे.

UPI ने केली क्रांती

UPI चा पर्याय उपलब्ध झाल्याने आता सर्वच व्यक्ती शक्यतो जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करतात. एखाद्या ठिकाणी रोख रक्कम कमी पडत असेल किंवा रोख रक्कम जवळ नसेल अशावेळी UPI मार्फत तातडीने तिथे व्यवहार करता येतो. UPI मुळे सहज कुठेही कोणतीही गोष्ट खरेदी करता येते. पूर्वी मार्केटमध्ये किंवा बसमध्ये पाकीट चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या होत्या. UPI मुळे व्यक्ती पाकीटात आपले पैसेच ठेवत नाहीत. त्यामुळे चोरीच्या घटनांपासून देखील बचाव होत आहे.

कोरोनानंतर वाढलं UPI

व्यक्ती सुरुवातीला मोठ्या आणि ठरावीक ठिकाणीच UPI चा वापर करत होते. मात्र कोरोना काळात याचा वापर झपाट्याने वाढला. वस्तु खरेदी करताना किंवा दवाखान्यात देखील UPI मार्फत व्यवहार होऊ लागले आहेत. आता UPI चं जाळं प्रचंड मोठं झालं आहे.

UPI नं खिशाला लावली कात्री

सुरवातीला ऑनलाईन पेमेंटचा पर्याय फक्त मोठ्या मॉल्समध्ये आणि शोरुममध्ये उपलब्ध होता. मात्र आता हा पर्याय अगदी लहानशा भाजी मार्केटमध्ये प्रत्येक भाजी विक्रेता, किराणा दुकान, दूध विक्रेता सगळीकडे उपलब्ध आहे. बऱ्याच व्यक्ती आता कॅशलेस व्यवहार करतात. कॅशलेस व्यवहार जितका फायद्याचा आहे तितकाच खिसा रिकामा करणारा आहे असं अनेक व्यक्ती सांगतात.

कारण पूर्वी प्रत्येक व्यक्तीचं महिन्याचं बजेट ठरलेलं असायचं. बाकीचे पैशांची बँकेत बचत केली जात होती. त्यामुळे रस्त्याने जाताना एखादी चैनीची वस्तू आवडली आणि ती खरेदी करावी वाटली की व्यक्ती त्यासाठी पैसे साठवून मग ती खरेदी करायचे. मात्र आता UPI पेमेंट होत असल्याने बचत केलेले पैसे देखील व्यक्ती लगेचच खर्च करतात. अशा अनेक कामांत UPI मुळे आधीपेक्षा आताचा खर्च जास्त वाढला आहे.

UPI वर जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे?

UPI वर तुमचेही जास्त पैसे खर्च होत असतील तर सतत बँक बॅलेंस तपासत राहा.

जास्त खर्च टाळण्यासाठी २ अकाउंट सुरू करा. तुम्ही ज्या खात्याचे UPI वापरत आहात त्यात मोजकेच पैसे ठेवा.

तुमचं जे खातं तुम्ही सतत वापरत नाही. तसेच ज्याचे UPI नाही अशा खात्यात तुमचे इतर सर्व पैसे ठेवा.

Digital Payments
RBI UPI Tax Limit: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! RBI ने UPI द्वारे टॅक्स पेमेंट करण्याची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com