Eid Milad-Un-Nabi 2023 : ईदच्या मेजवानीत ट्राय करा 2 प्रकारच्या शेवया, एकदम परफेक्ट बनतील; पाहा रेसिपी

Recipe Of Sewai : ईद मिलाद-उन-नबी हा पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
Eid Milad-Un-Nabi 2023
Eid Milad-Un-Nabi 2023Saam Tv
Published On

Sewai Recipe For Eid Milad-Un-Nabi :

ईद मिलाद-उन-नबी हा पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक मुस्लिम कुटुंबात आनंदाने साजरा करतात. अशा स्थितीत प्रत्येक घरात काही खास रेसिपी बनवल्या जातात. यापैकी एक म्हणजे शेवया.

तुम्ही शेवया अनेक प्रकारे बनवू शकता. खरं तर, दुधाच्या (Milk) शेवया सर्वत्र बनवल्या जातात पण तुमच्यापैकी फार कमी लोकांना या शेवयाच्या आणखीन रेसिपीज माहिती आहेत का? तुम्ही ते कधी बनवले आहेत का? तर घरच्या घरी करा, कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

Eid Milad-Un-Nabi 2023
Weight Gain Recipe : पीनट बटर ठरेल वजन वाढवण्यासाठी उपयुक्त, सकाळच्या नाशत्यामध्ये या 3 रेसिपींचा समावेश आजच करा

किवामी शेवया रेसिपी

किवामी शेवया ही रेसिपी लखनौमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये शेवया किसलेल्या मांसाप्रमाणे (खिमा) बनवल्या जातात. हे करण्यासाठी 250 ग्रॅम बारीक शेवया भाजून घ्या. आता त्यात तूप घालून मध्यम आचेवर शिजवा.

नंतर दुसऱ्या भांड्यात साखर (Sugar) घाला, चांगले मिश्रण तयार करा आणि त्यात शेवया घाला. आता ड्रायफ्रुट्स आणि इतर गोष्टी बारीक करून मिक्स करा. आणि मंद आचेवर शिजवा आणि 10 मिनिटांत शिजल्यावर गॅस बंद करा तुमची रेसिपी तयार आहे.

शाही फिरणी रेसिपी

शाही फिरणी बनवण्यासाठी तुम्ही तांदूळ (Rice) किंवा शेवया वापरू शकता. तुम्हाला फक्त शेवया तळून बाजूला ठेवाव्यात. यामध्ये तुम्हाला अतिशय बारीक शेवया वापरायच्या आहेत हे लक्षात ठेवा. आता आणखी दूध घेऊन त्यात केशर घालून चांगले शिजवून घ्या. ते घट्ट होईपर्यंत शिजवा. नंतर पिस्ता, बदाम आणि वेलची घालून चांगले शिजवून घ्या आणि सर्व करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com