How To Cure Acidity At Home Instantly: यंदाच्या होळीत खा खा खाल्ल ? अॅसिडिटीचा त्रास होतोय ? घरगुती हाच एकमेव उपाय

Acidity Problem : सणादरम्‍यान हवेहवेशे वाटणाऱ्या खाद्यपदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्‍यास तुमच्‍या पचनशक्‍तीवर परिणाम होऊ शकतो.
How To Cure Acidity At Home Instantly
How To Cure Acidity At Home Instantly Saam Tv

Home Remedies For Acidity : रंगांचा सण होळी जवळच आला की, कुटुंबिय व मित्रांसोबत होळी खेळण्‍यासह तळलेले व गोड पदार्थ आणि पेय यांचा मोठया प्रमाणात आस्‍वाद घेतला जातो. पण अशा सणादरम्‍यान हवेहवेशे वाटणाऱ्या खाद्यपदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्‍यास तुमच्‍या पचनशक्‍तीवर परिणाम होऊ शकतो.

कमी वेळेत जास्त खाणे, तळलेले पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्याने पोटात अॅसिडिटी सारख्या अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडीटी रिफ्लेक्‍स म्‍हणून देखील ओळखली जाणारी ही स्थिती पोटात मोठ्या प्रमाणात अॅसिड निर्माण झाल्‍यामुळे उद्भवते.

How To Cure Acidity At Home Instantly
Acidity Problem : जेवल्यानंतर लगेच छातीत होते जळजळ, मग 'हे' करुन पाहा

अन्‍ननलिकेमध्‍ये हे खाद्यपदार्थ परतत असल्‍याने अॅसिडीटी होते. यामुळे छातीमध्‍ये असह्य जळजळ होऊ शकते, घशामध्‍ये आंबट चव जाणवू शकते. पचन, मळमळ आणि बद्धकोष्ठता ही देखील अॅसिड रिफ्लेक्सची इतर सामान्य लक्षणे (Symptoms) आहेत.

डॉ केयुर शेठ, कन्‍सल्‍टण्‍ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व हेपॅटोलॉजिस्ट, मुंबई म्हणातात, तब्बल ३० टक्‍के भारतीयांना वारंवार छातीत जळजळ, पोटात गोळा येणे आणि मळमळ होण्याची लक्षणे जाणवतात. ही सामान्यत: अॅसिड रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स आजाराची लक्षणे आहेत, जे जीईआरडी म्हणून ओळखली जाते आणि त्‍यामुळे अस्वस्थता येते शकते. जीवनशैली व आहारातील (Food) बदल आणि अँटासिड्स सारख्या औषधांसह (Medicine) अनेक उपाय त्‍वरित किंवा दीर्घकाळापर्यंत आराम देतात

How To Cure Acidity At Home Instantly
Causes of Uric Acid : पोटात जाताच 'ही' फळे शरीरात वाढवतात यूरिक अॅसिडची समस्या, किडनी स्टोनचा देखील वाढतो धोका !

अॅबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डायरेक्‍टर डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, अनारोग्यकारक आहार व जीवनशैलींमुळे भारतातील अधिकाधिक व्‍यक्‍तींना अॅसिडीटीचा त्रास होताना दिसून येत आहे. संतुलित आहाराचे सेवन करत अॅसिडीटीमध्ये सुधारणा करता येऊ शकते. तसेच झटपट थंड करणारे अँटासिड्स देखील जलद आणि प्रभावी आरामासाठी एक पर्याय असू शकतात. पोटातील अॅसिडीटीशी संबंधित अस्वस्थता कमी केल्याने व्‍यक्‍तींना त्‍यांचा उर्वरित दिवस उत्तम व्यतित करण्यास आणि निरोगी, परिपूर्ण जीवनाचा भाग म्हणून ज्या गोष्टींचा आनंद मिळतो त्या करत राहण्यास मदत होऊ शकते.

अॅसिडीटीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी हे घरगुती उपाय फॉलो करा

1. त्वरित आराम मिळवण्यासाठी

  • तुळशी पाने धुवून चघळा किंवा एक कप पाण्‍यात (Water) पाने उकळवून काढा बनवा, गरम व सुखदायक चहा म्हणून सेवन करा.

  • बडीशेप काही तास पाण्यात भिजत ठेवा आणि जेवणानंतर खा किंवा थेट बिया चावून खा.

  • थोडा गूळ थंड पाण्यात भिजवून ते प्या किंवा जेवणानंतर थोडासा तुकडा खा.

  • दिवसभर मूठभर सुके बदाम केळ्यांसोबत सेवन करा.

How To Cure Acidity At Home Instantly
Acidity Problems : अॅसिडिटीच्या दरम्यान डोकेदुखीचा त्रास का होतो? जाणून घ्या

2.दीर्घकाळापर्यंत आराम देणारा उपाय

अॅसिडीटीपासून दीर्घकाळपर्यंत आराम मिळवण्‍याकरिता तुम्‍ही ओव्‍हर-द-काऊंटर उपलब्‍ध असलेले अँटासिड्स घेऊ शकता. यामुळे तुम्‍ही घरी, कामाच्‍या ठिकाणी, चालता-फिरता पोटातील अॅसिड निष्‍प्रभ होत अॅसिडीटी्या लक्षणांपासून आराम मिळवू शकता. आज हे चघळण्यायोग्य टॅब्लेटपासून द्रव-आधारित जेल सिरपपर्यंत, संत्रा, पुदीना आणि मिश्र फळांसारख्या चवदार फ्लेवर्समध्ये व सोप्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

3.वारंवार होणाऱ्या अॅसिडीटीसाठी प्रतिबंधात्‍मक उपायांचा अवलंब

पोटातील अॅसिडीटीचे व्‍यवस्‍थापन कसे करावे हे माहित असण्‍यासोबत विशेषत: वारंवार अॅसिडीटी होत असल्‍यास त्‍यावर कशाप्रकारे प्रतिबंध ठेवावा हे देखील माहित असणे महत्त्वाचे आहे. काही जीवनशैली व आहारविषयक सूचना आहेत, ज्‍यांचे तुम्‍ही वर्षभर या स्थितीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी पालन करू शकता.

तळलेले पदार्थ व फॅट-युक्‍त मिठाई आणि मसालेदार पदार्थ (विविध प्रकारचे चाट, भाज्या किंवा गरम मसाला असलेल्या भाज्या) यांसह विशेषतः अॅसिड रिफ्लेक्स होण्याची शक्यता असलेले पदार्थ टाळा. यामध्ये फिरणी आणि दही वड्यापासून होळीच्या वेळी सेवन केल्‍या जाणाऱ्या खास पदार्थांचा समावेश आहे.

How To Cure Acidity At Home Instantly
Acidity Problem : छातीत वारंवार जळजळ होतेय ? 'या' 5 आयुर्वेदिक उपायांनी मिळेल त्वरीत आराम !

4. लक्षणांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी ट्रिगर्स लक्षात ठेवा.

  • खाण्‍याच्‍या बाबतीत वेळेचे पालन करा, ज्‍यामध्‍ये सणाचा आनंद घेत असताना विलंब होऊ शकतो. तुमचा आहार व झोपण्‍याच्‍या वेळेमध्‍ये किमान एक तासाचे अंतर ठेवा.

  • जेवणानंतर घट्ट कपडे घालणे टाळा.

  • उत्तमरित्‍या हायड्रेटेड राहा आणि सातत्‍याने पुरेशी झोप घ्‍या व दररोज व्‍यायाम करा.

  • अॅसिडिटीचा उपाय न केल्यास आपल्याला खूप अस्वस्थ वाटते. सुदैवाने, लक्षणे कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करता येऊ शकतो. घरगुती उपचार, अँटासिड उपाय आणि जीवनशैली व आहाराच्या उपायांनी जलद आणि दीर्घकाळ आराम मिळू शकतो.

  • लक्षणे कायम राहिल्यास किंवा तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com