Diabetes : रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची आहे? तर, मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 'या' टिप्स फॉलो करा

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व तणावामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे.
Diabetes
DiabetesSaam Tv

Diabetes : सध्याच्या काळात निरोगी राहाणे सगळ्यांसाठी आव्हानात्मक आहे. यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व तणावामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे.

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना नेहमीचा स्वत:ची काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्यापासून ते दिवसभर वाढणाऱ्या रक्तातील साखरेची (Sugar) पातळी वाढवण्यापर्यंत. बरेच मधुमेहींना असे वाटते की, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहायला हवी. त्यासाठी आपण दिनचर्या बदलून म्हणजे सुधारित आणि संतुलित आहार घेऊन रोगापासून दूर राहू शकतो.

चुकीचे खाणे आणि दीर्घकाळ जास्त विश्रांती यामुळे अनेक रोग बळकावतात. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही नियमांचे पालन करायला हवे. त्याच वेळी, मधुमेहाच्या रुग्णांनी साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज या टिप्स पाळल्या पाहिजेत. जाणून घेऊया (Sugar Control Tips In Marathi)

Diabetes
Diabetes Control Tips : मधुमेहासाठी रामबाण आहे 'या' मसाल्याचे पाणी, रक्तातील साखरेची पातळी देखील राहाते नियंत्रणात

1. पाणी पिणे

सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास कोमट पाणीही पिऊ शकता. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच शरीर हायड्रेटेड राहते. तज्ज्ञांच्या मते, दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही मदत होते. यासाठी सकाळी उठल्यानंतर किमान २ ग्लास पाणी प्यावे.

2. कॅफिनचे सेवन करू नका

अनेकदा लोक दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने करतात. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते, जे आरोग्यासाठी चांगले नाही. त्याचबरोबर साखरयुक्त चहा प्यायल्याने शरीरातील साखर वाढते. यासाठी सकाळी चहा-कॉफीचे सेवन कमी करा. त्याऐवजी ग्रीन टी प्या.

Diabetes
Diabetes : तज्ज्ञांनी सांगितले, मधुमेह असणाऱ्यांना मिळेल आता आराम; करा 'या' रोपाचे सेवन !

3. व्यायाम करा

निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. त्याचबरोबर साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा. यासाठी रोज चालावे. तुम्ही योगाचीही मदत घेऊ शकता. योगाची अनेक आसने आहेत, ज्याद्वारे साखर नियंत्रणात राहते.

4. तणावापासून दूर राहा

आजकाल लोकांना धकाधकीचे जीवन जगण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याचबरोबर रक्तदाब वाढल्याने मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी तणावापासून दूर राहा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com