Dengue Symptoms In Kids : मुलांमध्ये झपाट्याने वाढतोय डेंग्यू, लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका;अन्यथा...

4 Common Symptoms In Dengue : सध्या लहान मुलांमध्ये डेंग्यूचा शिरकाव अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे.
Dengue Symptoms In Kids
Dengue Symptoms In KidsSaam Tv

Dengue Causes :

पावसाळा म्हटलं की, अनेक आजार डोकी वर काढतात. सध्या डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार मुलांमध्ये सातत्याने वाढताना दिसत आहे. दूषित पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार थैमान घालतात. ज्यामुळे देशभरात आजाराची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

सध्या लहान मुलांमध्ये डेंग्यूचा शिरकाव अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजकाल मुले विषाणूपासून ते डेंग्यूपर्यंतच्या अत्यंत मोठ्या आजारांना बळी पडत आहेत. अशाच परिस्थितीत जर मुलं आजारी पडत असतील किंवा त्यांना वारंवार सर्दी-ताप येत असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवी.

Dengue Symptoms In Kids
Dengue Platelets Count : डेंग्यूमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी का होतात? अशावेळी कोणते पदार्थ खावे? जाणून घ्या

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) च्या मते , डेंग्यू हा फ्लूचा आजार आहे, जो एडिस प्रजातीच्या डासांमुळे पसरतो. डेंग्यूची (Dengue) लागण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाही, परंतु त्यामुळे ताप येऊ शकतो आणि तो ताप वाढू देखील शकतो. जर तुमच्या मुलांमध्ये देखील पुढील लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • ताप

  • डोकेदुखी

  • शरीर वेदना

  • मळमळ

  • पुरळ

  • आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमध्ये डेंग्यूचे संक्रमण लगेच होते. त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत नसते. या लक्षणांच्या (Symptoms) मदतीने तुम्ही डेंग्यूची लक्षणे ओळखू शकता.

Dengue Symptoms In Kids
Cloves Benefits : रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ लवंग, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

1. डोकेदुखी

मुलांना अस्वस्थता किंवा शरीरात वेदना होत असतील तर डेंग्यूचे लक्षण असू शकते. तसेच मुलांना डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे हलके दुखणे, स्नायू आणि सांधे दुखणे इत्यादी तक्रारी असू शकतात.

2. ताप

ताप हे डेंग्यूचे सामान्य लक्षण आहे. जर तुमच्या मुलाला 105 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत ताप येत असेल, तर तुमचे मूल डेंग्यूचा बळी असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये सर्दी, खोकला आणि अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसू लागतात.

3. त्वचेवर पुरळ उठणे

डेंग्यूमुळे अनेकदा त्वचेवर खाज सुटते किंवा पुरळ उठतात. याशिवाय, पायांच्या तळव्यावर सतत खाज येणे हे देखील मुलांमध्ये डेंग्यूचे लक्षण असू शकते.

Dengue Symptoms In Kids
Dengue Symptoms : डेंग्यूच्या आजारामुळे टक्कल पडण्याचा धोका? ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

4. उलट्या

डेंग्यूमुळे मुलांमध्ये अनेकदा उलट्यांचा त्रास दिसून येतो. जर तुमच्या मुलाला काहीही खाल्ल्यानंतर उलट्या होत असतील किंवा गिळण्यास त्रास होत असेल तर तुमच्या मुलाला डेंग्यूची लागण होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com