या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दूरदृष्टी होऊ शकते कमजोर

या दोन जीवनसत्त्वाचा आहारात समावेश करा.
Benefits of vitamins, vitamin deficiencies that can lead to vision loss
Benefits of vitamins, vitamin deficiencies that can lead to vision lossब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : जीवनसत्त्वे आपल्या शरीरासाठी अधिक महत्त्वाचे असतात. जीवनसत्त्वाची आपल्या शरीरात कमतरता निर्माण झाल्यास आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

हे देखील पहा-

आपल्याला आरोग्यदायी आहारातून अनेक जीवनसत्त्व मिळतात. तसेच जीवनसत्त्व शरीरात कमी झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला जीवनसत्त्व वाढवण्यासाठी औषधे लिहून देतात परंतु, काही ठराविक जीवनसत्त्वांची शरीरात कमतरता झाल्यानंतर आपल्याला डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनसत्त्वे व खनिजे हे आपल्या शरीराला आवश्यक तसे पोषक घटक देतात. याचे कार्य आपल्या शरीरातील हाडांना मजबूत करण्यापासून ते मेंदू व हार्मोन्सचे कार्य सुरळीत पार पाडण्यापर्यंत खूप महत्त्वाचे असते.

१. आपल्या शरीराल १३ जीवनसत्त्वांची आवश्यक असतात. जी आपल्याला वेगवेगळ्या अन्न स्त्रोतांमधून मिळतात. प्रत्येक जीवनसत्त्वांची वेगवेगळी भूमिका असते. याच्या कमतरेतमुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्वसाधारणपणे जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, चिडचिड ते हाड कमकुवत होणे, त्वचेचा रंग बदलणे सहज किंवा वारंवार जखम होणे यासारख्या अनेक लक्षण दिसू लागतात.

Benefits of vitamins, vitamin deficiencies that can lead to vision loss
नवजात बाळाला दूध प्यायल्यानंतर उलटी होते; तर जाणून घ्या त्यामागचे कारण

२. जीवनसत्त्व ए आणि ब - १२ ची कमतरता शरीरात कमी झाल्यावर डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जीवनसत्त्व ए च्या कमतरतेमुळे कॉर्निया खूप कोरडा होऊन अंधत्व येते, त्यामुळे डोळयातील पडदा आणि कॉर्नियाला नुकसान होते. तसेच जीवनसत्त्व (Vitamins) ब-१२ हा मेंदू व मज्जातंतू पेशींच्या कार्यासाठी आणि विकासासाठी आवश्यक असे पोषक तत्व असतात ज्यामुळे ते आपल्या मेंदूसोबतच आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर ठरतात.

३. रातांधळेपणा हे जीवनसत्त्व ए च्या कमतरतेमुळे होते. यामध्ये डोळे (Eye) कोरडे होतात, त्वचेची जळजळ होणे, वाढ खुंटणे, प्रजननाची समस्या होऊ लागते. तसेच जीवनसत्त्व ब-१२ च्या कमतरतेमुळे त्वचा पिवळी दिसणे, घसा व जीभ लाल होणे, तोंडात व्रण येणे, धूरकट दिसणे, चिडचिड व नैराश्य येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

४. चीज, अंडी, मासे, दूध व दह्यात जीवनसत्त्व ए चे सर्वोत्तम स्त्रोत आहे. पालक, गाजर, रताळे आणि लाल मिरची यांसारख्या पिवळ्या, लाल व हिरव्या भाज्या आणि आंबा, पपई व जर्दाळू यासारखी पिवळी फळे बीटा-कॅरोटीनचे चांगले स्रोत आहेत. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व ए व ब -१२ अधिक प्रमाणात आढळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com