Death Symptoms: मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं हे ३ संकेत! हॉस्पिस नर्सने सांगितला धक्कादायक अनुभव

End Of Life Care: मृत्यूच्या जवळ असताना शरीरात कोणते बदल दिसतात? अमेरिकेतील हॉस्पिस नर्स ज्युली मॅकफॅडन यांनी १६ वर्षांच्या अनुभवातून भूक, झोप आणि श्वासातील बदलांची माहिती दिली आहे.
death symptoms
death symptomssaam tv
Published On: 

माणसाला मृत्यू कधी येईल हे माहित नसतं. पण अचानक मृत्यू येण्यामागे खूप वेगवगेळी कारणं असतात. काहींना काही गंभीर आजारामुळे मृत्यू येतो, काहींचा अपघातात मृत्यू होतो, काहींना झोपेतच मृत्यू येतो. मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ सत्य आहे. मात्र, मृत्यूचा विचार केला तरी अनेकांना भीती वाटते.

आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची चिंता असो किंवा स्वत:च्या मृत्यूची भीती हा अनुभव बऱ्याचणांसाठी भावनिकदृष्ट्या कठीण असतो. अशातच अमेरिकेतल्या एका अनुभवी हॉस्पिस नर्सने मृ्त्यूच्या अगदी जवळ असलेल्या रुग्णांमध्ये दिसणारे काही सामान्य बदल सांगितले आहेत. तिच्या १६ वर्षांच्या अनुभवातून समोर आलेल्या या गोष्टींमुळे मृत्यूच्या प्रक्रियेबद्दल असलेली भीती कमी व्हायला मदत होऊ शकते.

death symptoms
8th Pay Commission : 8व्या वेतन आयोगाला एक वर्ष पूर्ण! आता पगारवाढीसाठी किती महिने थांबावे लागणार? अपडेट आली समोर

कोण आहेत नर्स ज्युली मॅकफॅडन?

अमेरिकेतल्या हॉस्पिस नर्स ज्युली मॅकफॅडन या गेल्या १६ वर्षांपासून गंभीर आणि असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेतायेत. सोशल मीडियावर त्या 'नर्स ज्युली' या नावाने प्रसिद्धही झाल्या आहेत. टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर त्या मृत्यू, शेवटचा काळ आणि रुग्णांच्या अनुभवांविषयी माहिती शेअर करतात.

त्यांनी 'Nothing to Fear: Demystifying Death to Live More Fully' हे पुस्तकही लिहिले आहे. मृत्यूविषयीचे गैरसमज दूर करणं आणि या प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश आहे.

death symptoms
Shani Vakri 2027 : २०२७ मध्ये शनीची उलटी चाल! १३८ दिवस या ५ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ

मृत्यूच्या जवळ दिसणारे ३ सामान्य बदल

नर्स ज्युली यांच्या अनुभवातून मृत्यूच्या जवळ असलेल्या रुग्णांमध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश होतो.

१. खाण्या-पिण्याची इच्छा कमी होणे

मृत्यू जवळ येत असताना अनेक रुग्णांची भूक आणि तहान कमी होऊ शकते. शरीराची ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे अन्न आणि पाण्याची गरजही बदलते. अशा वेळी रुग्णाला जबरदस्तीने खाऊ-पिऊ घालण्याऐवजी वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे महत्त्वाचे असते.

२. झोप वाढणे आणि प्रतिसाद कमी होणे

अनेक रुग्ण शेवटच्या काळात अधिक वेळ झोपून राहतात. त्यांना जागे करणे कठीण होऊ शकते. बोलण्याची किंवा आसपासच्या लोकांना प्रतिसाद देण्याची क्षमताही कमी होऊ शकते.

३. श्वासोच्छवासाच्या पद्धतीत बदल

मृत्यू जवळ येताना श्वास घेण्याची गती अनियमित होऊ शकते. काही वेळ श्वास वेगाने सुरू राहतो, तर काही वेळ थांबल्यासारखा वाटतो. काही रुग्णांच्या श्वासातून घरघर किंवा वेगळा आवाजही येऊ शकतो.

मृत्यूची भीती बाळगण्याची गरज आहे का?

मृत्यूची भीती वाटणे ही सामान्य मानवी भावना आहे. संशोधनानुसार काही लोकांमध्ये मृत्यूविषयी तीव्र चिंता आढळते. मात्र, मृत्यूच्या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती आणि समुपदेशन मिळाल्यास ही भीती कमी होऊ शकते.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.