स्वयंपाकघरातील या मसाल्यांनी मधुमेहला नियंत्रणात ठेवा!

मधुमेह हा कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो.
Diabetes Control tips, Health tips
Diabetes Control tips, Health tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मधुमेह हा आजार सामान्यत: सगळ्यांमध्ये दिसून येतो. काहींना आनुवंशिक असतो तर काहींना बदलेल्या खाण्याच्या सवयी किंवा सतत तणावामुळे हा आजार उद्भवतो.

हे देखील पहा-

आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे आपले अनेक आजार सहज बरे होतात. मधुमेह हा कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो.सर्दी, ताप किंवा खोकला झाला की, आधी आपण काही घरगुती उपचार करतो. बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव व अयोग्य आहारांमुळे आपल्या मधुमेहाचा त्रास जडू शकतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की, आपल्या अनेक त्रास उद्भवू शकतात. स्वयंपाकघरातील कोणत्या मसाल्यांचा वापर करुन आपण मधुमेहाला नियंत्रणात आणू शकतो ते पाहूया.

१. दालचिनीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. यांचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहते व शरीरासंबंधीत असणाऱ्या इतर समस्यांवर देखील नियंत्रण मिळवता येते.

Diabetes Control tips, Health tips
शरीरातील ऊर्जा नष्ट करणारे हे पदार्थ डाएटमधून आजच बाहेर करा

२. मेथीचे दाणे हे जितके स्वयंपाकघरात उपयुक्त आहे तितकेच ते आरोग्याला फायदेशीर आहे. जेवणाची चव वाढवण्यापासून ते केसांच्या वाढीपर्यंत त्याचे कार्य आहे. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथीच्या दाण्याला रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी अनोशीपोटी त्याचे सेवन करावे.

३. हळद (Turmeric) ही जितकी धार्मिक कार्यात वापरली जाते तितकाच तिचा वापर हा आपल्या आरोग्यासाठी देखील होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हळदीला गुणकारी मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी दूधासोबत हळदीचे सेवन केल्यास फायदा होतो.

४. लंवग हे स्वयंपाकघरात (Kitchen) सहज मिळणारा असा पदार्थ आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या शरीराला विशेष फायदा होतो. लंवग हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात तर ठेवतेच तसेच ती शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com