Bad Cholesterol Level Control : दीर्घकाळ जगण्यासाठी तुम्ही दररोज सॅलाड खाल्ले पाहिजे. तुमच्या आहारामध्ये त्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला पोषक तत्वे मिळतील. सोबतच एनर्जी मिळेल आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे सेवन करून तुमचे डोळे, त्वचा आणि अंतरज्ञानेंद्रिये चांगली राहतील.
सोबतच सॅलाड खाऊन तुम्ही तुमचे वजन देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकता. सॅलाडमध्ये फायबर आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात (Diet) सॅलाडला नक्की सामिल केले पाहिजे. चला तर मग जाऊन घेऊया सॅलाड खाऊन तुम्ही कोणकोणते लाभ घेऊ शकता.
सॅलाडमध्ये उपलब्ध असलेले पोषक तत्वे -
सॅलाड बनवण्यासाठी अनेक हिरव्या पालेभाज्या वापरल्या जातात. ज्यामुळे याचे पोषक तत्वे वाढतात. सॅलाडमध्ये कांदा, काकडी, टोमॅटो, केळी, पालक, काकडी, मुळी, ब्रोकली, गाजर, लिंबू या सगळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे उपलब्ध असतात.
हे व्हिटामिन (Vitamins) आणि मिनरल्सचे खजिने आहेत. सोबतच सलाडमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, कार्बोहाइड्रेट, पोटॅशियम, झिंक आणि सोडियम भरपूर प्रमाणात असते.
फिटपास डॉट को डॉट इनमध्ये आलेल्या बातमीनुसार सॅलाड कोलेस्ट्रॉल लेवलला रेग्युलेट करतो. बॅड कोलेस्ट्रॉलच्या स्तराला कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. सॅलाडमध्ये उपलब्ध असलेले फायबर ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी फायदेशीर असते.
सोबतच डोळयांच्या आरोग्यासाठी सॅलाड अतीशय चांगले असते. सलाडमध्ये भरपूर प्रकारचा भाज्या टाकल्या जातात. भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए उपलब्ध असते. गाजर, ब्रोकली, टोमॅटो यांसारख्या भाज्यांमध्ये तर, व्हिटॅमिन एचे भरपूर गुण उपलब्ध असतात.
सलाड खाल्याने मासपेशी मजबूत बनतात. जर तुम्ही गाजर आणि पालक टाकून सलाड बनवत असाल तर, तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळेल. सोबतच एम्यूनिटी मजबूत करण्यासाठी तुम्ही सलाडचे सेवन केले पाहिजे. सलाडमध्ये लिंबू आणि टोमॅटो टाकल्याने वीटामीन सीची कमतरता पूर्ण होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.