सावधान! Ceiling Fan खरेदी करताय? केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिल्या महत्त्वाच्या टीप्स

Ceiling Fan Tips : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी योग्य सीलिंग फॅन कसा निवडायचा याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे.
Ceiling Fan Tips
Ceiling Fan TipsSaam Tv
Published On

How To Buy Ceiling Fan :

सीलिंग फॅन हा प्रत्येक घरांमध्ये पाहायला मिळतो. हिवाळ्यात याची विक्री थोड्याफार प्रमाणात मंदावत असली तरी खरेदीसाठी यात विक्रमी वाढ होत असते. बरेचदा सीलिंग फॅन खरेदी करताना आपण बाजारात जाण्याऐवजी ऑनलाइन ऑर्डर करतो.

परंतु, याबाबात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी योग्य सीलिंग फॅन कसा निवडायचा याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ISI मार्क तपासा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना सर्तक केले आहे. ग्राहकांच्या फायद्यासाठी (Benefits) ग्राहक मंत्रालयाने कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत. ग्राहकांनी सीलिंग फॅन खरेदी (Shopping) करताना त्यावर इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट मार्क किंवा आयएसआय मार्क तपासण्याचे आव्हान केले आहे.

2. नियमात कोणते बदल केले?

मंत्रालयाने सर्व फॅन कंपन्यांना (Company) आदेश दिले आहेत की, फेब्रुवारी २०२४ पासून विकल्या जाणाऱ्या सर्व सीलिंग फॅनवर भारतीय मानक ब्युरो (BSI)चे ISI मार्क असणे आवश्यक आहे. यापुढे ISI चिन्ह नसलेले पंखे विकण्याची, साठवण्याची किंवा निर्यात करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मंत्रालयाने दिलेल्या सुचनेनुसार या नियमांचे पालन न केल्यास २ लाख रुपयांचा दंड आणि २ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.

याशिवाय या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना ५ लाखांचा दंड किंवा उत्पादनाच्या मूल्याच्या १० पट वसूली होऊ शकते. यामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com