Virus: चीनने सोडला जीवघेणा व्हायरस? कोरोनापूर्वी सापडलेल्या व्हायरसचा पुन्हा धुमाकूळ

Virus: कोरोनापूर्वी सापडलेल्या व्हायरसचा पुन्हा धुमाकूळ घातलाय. या व्हायरसच नवा वेटलँड असून तो मेंदूवर हल्ला करतो.
Virus: चीनने सोडला जीवघेणा व्हायरस? कोरोनापूर्वी सापडलेल्या व्हायरसचा पुन्हा धुमाकूळ
Published On

संदीप चव्हाण , साम प्रतिनिधी

कोरोनापूर्वी ज्या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातला होता...त्याच व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय...या भयानक व्हायरसची माणसाला लागण झाली तर माणूस मानसिक आजाराने ग्रस्त होतो. काहींच्या जीवावरही हा व्हायरस बेतलाय.

पहिल्यांदा चीनच्या 61 वर्षीय नागरिकाला या व्हायरसची लागण झाली होती...ती व्यक्ती जंगलात फिरायला गेली होती.त्यावेळी रुग्णाची तपासणी केली असता मायटस नावाचा किडा नखांना चावल्यामुळे शरीरात रक्तावाटे व्हायरस पोहोचल्याचं निष्पन्न झालंय.मात्र, वेटलँड व्हायरस हा प्राणी किंवा मानवांमध्ये यापूर्वी कधीही दिसला नव्हता.हा व्हायरस किती घातक आहे पाहुयात.

चीनने सोडला जीवघेणा व्हायरस?

वेटलँड व्हायरस असं याचं नाव

कोरोनापूर्वी जून 2019 मध्ये चीनमध्ये आढळलेला

ताप, डोकेदुखी आणि उलट्या ही त्याची लक्षणे

थकवा, निद्रानाश, पाठदुखीचा त्रास जाणवतो

रुग्णाच्या मेंदूवर हल्ला करत असल्याने मानसिक त्रास होतो

काही रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं आढळलं

सध्या चीनमध्ये हा व्हायरस पसरलाय. रुग्णाच्या संसर्गातून दुसऱ्यांना हा व्हायरसचा धोका निर्माण होतोय. आता हा व्हायरस भारतात येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जातेय. जीवघेणा व्हायरस असून, रुग्णाला मानसिक त्रास होतो. त्यामुळे आपणही वेळीच खबरदारी बाळगायला हवी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com